भाईंदरमध्ये शिवसेना-भाजपामध्ये राडा

By admin | Published: July 15, 2017 11:57 AM2017-07-15T11:57:27+5:302017-07-15T11:57:27+5:30

भार्इंदर पूर्वेच्या महापालिका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पूर्वीच झाले असताना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्घाटन करण्यावरुन भाजपा व शिवसेनेत राडा झाला.

Rada in Bhaindar between Shiv Sena and BJP | भाईंदरमध्ये शिवसेना-भाजपामध्ये राडा

भाईंदरमध्ये शिवसेना-भाजपामध्ये राडा

Next

ऑनलाइन लोकमत 
मीरारोड, दि. 15 - भार्इंदर पूर्वेच्या महापालिका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पूर्वीच झाले असताना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्घाटन करण्यावरुन भाजपा व शिवसेनेत राडा झाला. भाजपा आमदारासह काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर एकाला शिवसैनिकाने चोपल्याने वातावरण तंग बनले.

मीरा भार्इंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रितसर झालेले होते. परंतु संकुलाचे बाकी असलेले काही काम व ते चालविण्यासाठी कुणी ठेकेदार येत नसल्याने ते सुरु केले जात नव्हते. मध्यंतरी जिद्दी मराठा संघटनेचे प्रदीप जंगम यांनी पालिके बाहेर धरणे आंदोलन केल्यावर अखेर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी कॅरम, बुद्धीबळ व बॅडमिंटनचे खेळ सुरू करायला लावले.

दरम्यान सदर क्रीडा संकुल चालवण्याचे कंत्राट भाजपाचे पदाधिकारी व आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तिय करणी चरण यांच्या चॅम्पियन फाऊंडेशनने मिळवले. या बाबतचा करारनामा शेवटच्या टप्प्यात असून त्या नंतर सदर संकुल पूर्णपणे सुरू केले जाणार आहे.

तोच पालिका निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने भाजपाने आज शुक्रवारी सदर संकुलाचे उद्घाटन करण्याचा परस्पर घाट घातल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली. स्थानिक नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका तारा घरत, नगरसेवक जयंतीलाल पाटील सह शैलेष पांडे, स्रेहा पांडे, सचीन घरत आदी शिवसैनिकांनी आधीच जाऊन क्रिडा संकुलाचे फित कापून व नारळ फोडुन उद्घाटन केल्याचे जाहिर केले. सेनेचे झेंडे लावले.

तोच भाजपा आ. मेहता, महापौर गीता जैन, नगरसेवक शरद पाटील, दिनेश जैन, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, नगरसेविका दिपीका अरोरा, डिंपल मेहता सह फिरोज शेख, संजय थरथरे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते संकुलाच्या आवारात भाजपाचे झेंडे घेऊनआले.

संकुलाचे उद्घाटन करण्यावरुन दोन्ही बाजुने घोषणाबाजी सुरु झाली. संकुलात प्रवेश करण्या वरुन धक्काबुक्की व मारहाण झाली. आ. मेहता सह थरथरेंना धक्काबुक्की झाली तर एका भाजपा कार्यकर्त्यास चोप बसला. थरथरेंना देखील मारहाण झाल्याची चर्चा होती. पण स्वत: थरथरे यांनी मारहाण नव्हे धक्काबुक्की झाल्याचे सांगीतले. आ. मेहतांशी संपर्क होऊ शकला नाही.

तर आम्ही स्थानिक नगरसेवक असुन येथील आमदार पण सेनेचे प्रताप सरनाईक आहेत. संकुलाला विरोध करणारया भाजपानेच परस्पर उद्घाटनाचा घाट घातल्याने शिवसेनेने त्यास प्रत्युत्तर दिल्याचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर म्हणाले.

भाजपा व शिवसेनेतील या राडेबाजीची माहिती नवघर पोलिसांना कळताच पोलिस फाटा घटनास्थळी धाऊन आला. पोलिस आल्यावर सर्वांची पांगापांग झाली.

- पालिकेचा कुठलाही उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता. या राडेबाजी बद्दल आपणास कल्पना नसुन बेकायदेशीर कृत्य करणारयांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करु. - डॉ. नरेश गीते, आयुक्त, मनपा 

 - जमावबंदीचा आदेश लागु आहे. या बाबत काय कारवाई करता येईल हे तपासुन पाहु -राम भालसिंग ,वरिष्ठ निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे 

 

Web Title: Rada in Bhaindar between Shiv Sena and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.