तेरेसा होमसाठी राधे माँ ट्रस्ट देणार ३० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:28 AM2018-11-12T05:28:55+5:302018-11-12T05:29:14+5:30

संगीत रजनी रंगली : खासदार गावितांनी दिलेत पाच लाख रुपये, सुसज्ज रुग्णालयदेखील आहे कार्यरत

Radhe Maa Trust will give 30 lakhs for the Teesta Home | तेरेसा होमसाठी राधे माँ ट्रस्ट देणार ३० लाख

तेरेसा होमसाठी राधे माँ ट्रस्ट देणार ३० लाख

Next

वसई : विरार पश्चिम ,सत्पाळा येथे असलेल्या मदर तेरेसा होम या वृद्धाश्रमाच्या आर्थिक मदतीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून शनिवारी संध्याकाळी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आध्यात्मिक गुरू राधे मॉ यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील रूग्णांसाठी पॅलेटीव्ह केअर सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. खासदार राजेंद्र गावीत, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.व्हिक्टर लोबो, फिशरमेन सेलचे अध्यक्ष रामदास मेहेर, भाजपा पदाधिकारी राजन नाईक, नगरसेवक मार्शल लोपीस आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित राहणार होत्या, मात्र काही कारणास्तव त्या येऊ शकल्या नाहीत. हजारो रसिक प्रेक्षकांनी यावेळी सादर करण्यात आलेल्या हिंदी गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सत्पाळा येथील मदर तेरेसा होम हे वृद्धाश्रम गेली 22 वर्षे वयोवृद्धांसाठी एक मायेची सावली देणारा निवारा म्हणून ओळखले जाते. अ‍ॅड. व्हिक्टर लोबो या समाजसेवेचा वसा घेतलेल्या व्यक्तीने १९९६ साली या वृद्धाश्रमाची स्थापना केली. आज या ठिकाणी १०० वयोवृद्ध आपली उतारवयाची संध्याकाळ आनंदात व्यतीत करीत असतात. ५२ महिला व ४८ पुरूष ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. ९ एकर जागेत हा वृद्धाश्रम असून सर्व जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहात आहेत. हा फक्त एक निवारा नसून एक अद्ययावत रूग्णालय आहे. आयसीयू केअर, पॅलेटीव्ह केअर युनिट,सेमी पॅलेटीव्ह केअर युनिट, जेरॅट्रीक केअर युनिट, सायकॅट्रीक केअर युनिट अशा वेगवेगळ्या युनिटमध्ये वयोवृद्ध रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर उपचार केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात वृद्धाश्रमात रूग्णसेवेची सुविधा असणारा हा एकमेव वृद्धाश्रम आहे. विशेष म्हणजे याठिकाणी मृत्युपश्चात मॉचेरी (शितगृह) सोय देखील करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर हिंदू ,मुस्लीम, ख्रिस्ती व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या धर्मानुसार दहन व दफनविधीची सोय देखील वृद्धाश्रम परिसरातच केलेली आहे .संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष अँड.विक्टर लोबो यांनी याबाबत माहिती देताना सांगीतले कि, विक्र मगड येथील सातपोर या गावात संस्थेच्या प्रेरणा फाऊंडेशनमार्फत नशामुक्ती केंद्र चालविले जाते.या केंद्रतही २०० रुग्णांवर उपचार केले जातात. त्यात टी बी,कॅन्सर, एच आयव्हीग्रस्त तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेले व अल्कोहोलीक रु ग्णांवर वेगवेगळ्या वार्डमध्ये उपचार केले जातात.या उपक्र मासाठी दानशूरांनी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
मदर तेरेसा होम वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी ठेवलेल्या संगीतमय रजनी कार्यक्र मासाठी तसेच वृद्धाश्रमास भेट देण्यासाठी अमृता फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून येणार होत्या. मात्र काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी आयोजकांना आपला संदेश पाठविला होता,त्यात त्यांनी या वृद्धाश्रमाच्या मार्फत एक चांगली मानव सेवा घडत असल्याचे सागून, आपण सदैव मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. लवकरच आपण या वृद्धाश्रमास भेट देऊ असे त्यांनी त्यात म्हटले होते. पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावीत यांनी,५ लाखांचा निधी या संस्थेला जाहिर करून वृद्धाश्रमातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय पाहून जानेवारी अखेरपर्यंत त्याला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जास्तीत जास्त मदत या संस्थेला कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्यातही असे अद्ययावत वृद्धाश्रम होणे गरजेचे असल्याचे सांगितले, गुरू राधे मॉ यांनी एक लाखांचा निधी यावेळी दिला तसेच पॅलेटीव्ह केअर रूग्णांसाठी बनविण्यात येणाऱ्या आठ रूमचा ३० लाखांचा खर्च त्यांच्या ट्रस्टमार्फत करणार असल्याचे जाहिर केले.

आईच्या आजारपणाच्या शेवटच्या दिवसात हि वृद्धाश्रमाची कल्पना सुचली. तिला मूर्त रूप माझ्या पत्नीच्या सहकार्यामुळे शक्य झाले. या लोकांची सेवा करतांना त्यांच्यात मला माझी आई दिसते. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य माझ्या हातून घडत रहावे.
- अ‍ॅड.व्हिक्टर लोबो, संस्थापक व अध्यक्ष, मदर तेरेसा होम

आईवडीलांची व निराधारांची सेवा हीच ईश्वर पूजा आहे आहे. माझे सहकार्य या उपक्र मास सदैव असेल.
- अध्यात्मिक गुरू राधे माँ

Web Title: Radhe Maa Trust will give 30 lakhs for the Teesta Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.