इंदिराजींनी जमीन देण्याचे दिलेले आश्वासन राहुल गांधी यांनी केले पुरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:18 AM2018-05-16T03:18:27+5:302018-05-16T03:18:27+5:30

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हसे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भेटीत तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा इंदिराजींनी केली असता गावासाठी रस्ता आणि माझ्या कला साधनेसाठी ३ एकर जागा द्या अशी मागणी त्यांनी केली.

Rahul Gandhi has given assurances given by Indiraji to the land! | इंदिराजींनी जमीन देण्याचे दिलेले आश्वासन राहुल गांधी यांनी केले पुरे!

इंदिराजींनी जमीन देण्याचे दिलेले आश्वासन राहुल गांधी यांनी केले पुरे!

Next

हितेन नाईक/ अनिरुध्द पाटील।
पालघर/बोर्डी : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हसे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भेटीत तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा इंदिराजींनी केली असता गावासाठी रस्ता आणि माझ्या कला साधनेसाठी ३ एकर जागा द्या अशी मागणी त्यांनी केली. गावाला रस्ता तर मिळाला परंतु जमीन काही मिळाली नाही. नंतर राहुल गांधी दौऱ्यावर आले असता त्यांनीही म्हसे यांनी भेट घेतली असता त्यांनी त्यांना तुमच्या आजीने दिलेले आश्वासन २७ वर्षे झाले अपूर्णच आहे असे सांगितले. तेव्हा त्यांनी हे आश्वासन प्रत्यक्षात उतरविले. त्यानंतर याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमात झळकले असता यंत्रणा जागी झाली आणि तीने ३ एकर जागा दिली. ती त्यांनी नाकारली.
ज्या जागेवर आदिवासी राहत आहेत ती जागा मला देऊ नका पडीक अथवा गुरेचरण जागा मला द्या असे त्यांनी सांगितले व जेंव्हा सरकारने हट्टाने त्याला पहिजे तीच जागा दिली तेव्हा त्यांनी त्या दोन एकर जागेपैकी एका एकर जागेवर पाणी सोडले कारण त्यावर अतिक्रमण झाले होते.
तलासरी तालुक्यातील धामण गावचे म्हसे हे मूळ कुटुंब असून त्यांचा जन्म ‘सवणे’ या गावी झाला. त्यानंतर लग्न झाल्यानंतर कामानिमित्त ते डहाणू तालुक्यातील गंजाड गावच्या कलमीपाडा येथे घर जावई म्हणून स्थायिक झाले. जिव्या म्हसे यांनी वारली चित्रकलेबद्दल केलेल्या अजोड कार्याची दखल घेऊन १९७६ साली त्यांना केंद्रशासनाने राष्ट्रपती पुरस्काराने तर २०११ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले. त्यानंतर त्यांना विविध संस्थांनी सोळा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरातील कलाकारांसाठी शोध मोहीम राबविली. केंद्रीय सांस्कृतिक विभागाच्या पुपल जयकर यांनी भास्कर कुलकर्णी यांच्यावर महाराष्टÑातील ही जबाबदारी सोपवली. त्यांना आदिवासींच्या लग्न विधितील चौक काढणाºया चित्रकलेची माहिती हवी असल्याने ते थेट तालुक्याती गंजाड गावात पोहचले. तेथील आदिवासी महिलाची कला पाहिल्यानंतर त्या कलाकारांना घेऊन दिल्लीला जाण्याचा मानस त्यांनी त्यांच्या समोर व्यक्त केला. मात्र त्यांनी त्या प्रस्तावास नकार देऊन जिव्या म्हसे यांचे नाव सुचवले. त्यांनी दिलेला प्रस्ताव पद्मश्री म्हसे ह्यांनी मान्य करून ते दिल्ली येथे गेले. त्यांनी काढलेल्या चित्रांची मोठी प्रशंसा झाली. आणि त्यांची शिफारस राष्ट्रपती पदका करिता करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या पन्नासाव्या वर्षांनिमित्त राज्यभरातील चित्रकारांचा गौरव करण्याचे शासनाने ठरविले असता जे जे आर्ट्स स्कूलचे प्राध्यापक सुधाकर यादव यांनी म्हसे यांचे नाव सुचविले. शासकीय कागदपत्राच्या पूर्ततेचे दिव्य पार पाडल्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस पुरस्कारा साठी करण्यात आली. सन २०११ साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या चित्रात आदिवासी समाजातील प्रत्येक कार्याचे प्रतिबिंब उमटल्याचे पहावयास मिळाल्यामुळे भारतात आलेले विविध देशांचे राजदूत त्यांना भेटण्यासाठी आवर्जून डहाणूच्या घरी येत असत.
>घरगडी ते जगविख्यात चित्रकार
गंजाड येथे घरजावई म्हणून आल्यानंतर ते नजीकच्या सावटे गावातील सरदारमल नहार या गवत व्यापाºयाकडे घरगड्याचे काम करू लागले. तेथे ते घोड्याचा टांगा चालविण्याचे कामही करीत. हे काम त्यांनी १५ वर्ष केले. म्हसे यांच्यातील कलागुण ओळखून मालकाने आदिवासी पेंटिंगच्या वृद्धीकरिता प्रोत्साहन दिलेच शिवाय ९ एकर २७ गुंठे जागा दिली. त्यांच्या फिरतीच्या काळात घराकडे लक्ष देण्याचे आश्वासन मालकाने दिले होते.म्हसे लहान असतांना त्यांच्या आईचे निधन झाले. दोन भावांपैकी जिव्या यांना लहानपणी सावत्र आईचा जाच सोसावा लागला. तथापि वडीलांना हे सहन न झाल्याने त्याना घरगडी म्हणून थोड्या पैशांवर देण्याचे ठरले होते. मात्र कर्मधर्म संयोगाने हा व्यवहार झाला नाही. मागच्या आठवड्यापर्यंत वडीलांनी पेंटिंग काढण्याची इच्छा आपल्याकडे हातच्या इशाºयाने बोलून दाखवली होती. शिवाय शेवटच्या टप्प्यात आपली काही चित्रे विकण्याचा त्याचा मानस होता. मात्र कुटुंबीयांनी त्याला स्पष्ट नकार दिल्याचे पुत्र सदाशिव यांनी सांगितले.म्हसे यांनी तीन वर्ष वारली पेंटिंग ट्रेनींग स्कूल गंजाड गावात चालवले. त्या मुळे पाड्यावरील २३ कलाकार घडविले गेले. आज त्यांना प्रसिद्धी आणि पैसा मिळतो आहे. त्यांच्या सदाशिव या मुलाने हे ट्रेनिंग स्कूल चालविण्याची इच्छा आजही व्यक्त केली. मात्र शासनाच्या अटी जाचक असल्याने त्या बाबतची नाराजी त्याने लोकमतकडे बोलून दाखवली.
>ती जमीन नाकारली : त्यांना तीन एकर जमीन गंजाड गावच्या सोमनाथ पाड्यावर दिली होती. मात्र आदिवासींचे कूळ हटवून देण्याचे सांगण्यात आले. परंतु जिव्या म्हसे यांनी त्याला स्पष्ट नकार देत. पडीक अथवा गुरचरण जागेची मागणी केली होती. त्यानंतर गंजाड गावात दोन एकर जमीन मिळाली. त्यातील एक एकर जागेवर स्थानिकांचे अतिक्र मण असल्याने, त्या जागेवर पाणी सोडले.

Web Title: Rahul Gandhi has given assurances given by Indiraji to the land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.