वसईत दोन डेअरींवर छापे; २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:17 AM2019-02-14T01:17:51+5:302019-02-14T01:19:13+5:30
येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत.
वसई : येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत.
बुधवारी वसईचे अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रतिबंधक विभागाने चिंचोटी कामण रोडवर असलेल्या अजय आणि साईनाथ या दोन डेअरींवर छापा टाकला. या वेळी अन्न सुरक्षा व दर्जात्मक नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नसल्याचे आढळून आले. या पथकाने अजय डेअरी येथून अंदाजे ७०० किलो, तर साईनाथ डेअरीमधून १८०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले.
त्याची किंमत ७ लाख ५० हजार इतकी आहे.
छापा टाकलेल्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी पनीरचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.