वसईत संतप्त प्रवाशांचे रेल रोको आंदोलन
By admin | Published: March 10, 2017 12:57 AM2017-03-10T00:57:34+5:302017-03-10T00:57:34+5:30
वसई रेल्वे स्टेशनवरून सुटणारी दुपारची पनवेल ट्रेन दररोज उशिराने सोडली जात असल्याने संतापलेल्या प्रवाशांनी वसई रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन केले.
वसई : वसई रेल्वे स्टेशनवरून सुटणारी दुपारची पनवेल ट्रेन दररोज उशिराने सोडली जात असल्याने संतापलेल्या प्रवाशांनी वसई रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन केले. या वेळी प्रवाशांनी विरारकडे जाणारी लोकल १० मिनिटे रोखून धरली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर रेल्वे सेवा सुरू झाली. आंदोलनामुळे विरार-चर्चगेटदरम्यान रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. वसई रेल्वे स्टेशनवरून दररोज दुपारी सव्वाबारा वाजता पनवेल मेमो गाडी सुटते. पण, गेल्या अनेक दिवसांपासून ही गाडी किमान अर्धा तास उशिरा सुटते आहे. याबाबत काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे धाव घेऊन तक्रार केली. मात्र, स्टेशन मास्तरांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रवासी संतापले होते. (प्रतिनिधी)