पावसाच्या धुवाधार बॅटिंगने वसई-विरारमध्ये साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:07 AM2020-07-29T01:07:14+5:302020-07-29T01:07:59+5:30
महामार्गावरील वाहतूक मंदावली : ग्रामीण भागात शेतकरी सुखावले
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : पाऊस जूनपासून लपंडाव खेळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होण्याची चिंता सतावत असतानाच सोमवारी रात्रीपासून कोसळणाºया पावसाने मंगळवारीही वसई तालुक्यात धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा या शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच विरार-पश्चिमेतील वटार गावात पाणी शिरल्याने हे गाव पाण्याखाली गेले होते. तसेच मुंबई-अहमदारबाद मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. पावसाच्या या दमदार पुनरागमनाने शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
वसई-विरार शहर परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन करत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वसईला पूरस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. गतवर्षीसारखी परिस्थिती ओढवली असती तर कोरोनाच्या संकटात बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. गेल्या वर्षी मिठागरातील वस्त्या, नागरी वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका पोहोचल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाºयांमार्फत त्यांना सुरिक्षत स्थळी हलवण्यात आले होते.
मुसळधार पावसात शहरांतील रस्ते, तसेच सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. नालासोपारा पूर्वेकडील सीतारा बेकरी, तुळिंज पोलीस ठाण्यासमोरील परिसर व गालानगर भागात दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ७ ते मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पावसाची तालुक्यात नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ११२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणसाठा वाढला
च्पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर शेतकरी सुखावले आहेत. तसेच धरणसाठ्यातही भर पडली आहे.
च्कडक उन्हामुळे पिके करपण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने पुनरागमन केल्यामुळे पिकांवरील धोका काही प्रमाणात टळल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
नालासोपाºयात रस्ते पाण्याखाली
\१नालासोपारा : सोमवारी रात्रभर नालासोपारा पाऊ स कोसळल्यामुळे नालासोपारा शहराच्या सखल भागात गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. सकाळी कामावर जाणाºया नोकरदारांना या पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
२नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क, विजयनगर, ओस्तवालनगर, अलकापुरी, गालानगर, टाकी रोड, प्रगतीनगर, महेश पार्कया ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीरामनगर या परिसरातही गुडघ्याच्या वर पाणी साचले होते.