भात आडवा, बळीराजा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:52 AM2018-07-13T02:52:45+5:302018-07-13T02:54:44+5:30
वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वसई - वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने अक्षरश शेतकºयांच्या शेताचे बांध तोडून पूर्ण शेतच वाहून नेले असल्याने नुकसानीचा आकडा मोठा आहे. वसईमध्ये जूनमध्येच पावासने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकºयांनी देखील पेरणीला जून मध्येच सुरु वात केली होती. मात्र, पावसाने पुन्हा एकदा बळीराजाचा विश्वासघात केला असून शेतामध्ये भाताच्या लोब्या आडव्या पडल्याने त्याच्या डोळ्यात आश्रु तरळले आहेत.
पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपा पेक्षा खुजे असते. महिनाभर उन्ह खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होऊन योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात. त्यामुळे राबणीच्या व धूळ वाफ्याच्या पेरण्या आटोपण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र या शेतकºयाचा सर्व मेहनतीवर पावसाने पाणी फिरवले आहे.
वसईत ५३५ मिमी पावसाची नोंद झाला आहे. आता शेतकर्याला भविष्याची चिंता सतावताना दिसून येत आहे. अनेकांनी कृषी विद्यापिठाकडून दर्जेदार बियाणे घेऊन त्याची पेरणी केली होती. या करीता विविध वित्त संस्था व बॅँकाकडून कर्जही घेतले होते. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयाची मेहनत व लावलेला पैसा वाया गेला आहे.