वसई-विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी, सखल भागात साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:51 AM2020-07-06T00:51:30+5:302020-07-06T00:51:30+5:30
वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली.
वसई : संपूर्ण जून महिन्यात वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही चिंतेत असताना शुक्रवारी रात्रीपासून सुरूझालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत संततधार लावली आहे. शनिवारी दिवसभर तसेच रविवारीही पावसाने वादळी वाºयासह चांगलीच हजेरी लावल्याने वसई-विरार परिसरात काही ठिकाणी झाडे कोसळली, तसेच इमारतींवरील शेड, होर्डिंग्जही कोसळल्याच्या घटना घडल्या. वसई आणि नालासोपारा शहरांतील सखल भागांत बहुतेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली. वसई-विरार शहर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेल्या झाडांना बाजूला सारून रस्ते वाहतूक सुरळीत केली. तसेच वसई रोड स्टेशनलगत काही इमारतींच्या टेरेसवर असलेल्या शेड व पत्रे उडून खाली पडले. यात खूप नुकसान झाले आहे तसेच आनंद नगर येथील एक लोखंडी कमान होर्डिंग शनिवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावर पडली, मात्र कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नाही.
वसई तालुक्यात दिवसभरात १०० हून अधिक मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. तसेच पेल्हार धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. थोड्या पावसात जलमय होण्यासाठी ओळखल्या जाणाºया नालासोपारा पूर्वेला सेंट्रल पार्क, तुळिंज रस्ता, महेश पार्क, गालानगर तर वसईतील नवघर-माणिकपूर शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराच्या वेगवेगळ्या सखल भागात रस्त्यावर पाणी साचले. गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने त्यातून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत होते. पहिल्याच पावसात ही स्थिती होत असेल तर पुढे मुसळधार पावसात काय होईल, असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे.
पश्चिमेला पालिका कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यांवरही पाणी होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पहिला पावसातच गटारे तुंबल्याने तात्काळ पाण्याचा निचरा होऊ शकला नाही.