Rain Updates: विरारमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या ३ म्हशी, दोघींना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:37 PM2021-06-17T18:37:12+5:302021-06-17T18:53:31+5:30
विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी येथील मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत.
आशिष राणे
वसई - चार दिवस विश्रांती घेऊन पुन्हा परतलेला पाऊस बुधवार रात्री पासून कोसळत असून गुरुजी या पावसाने कहरच केला आणि सर्वत्र पावसाने अवघ्या वसई विरार मध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण केली. यांत माणसं वाहतूक सोडा तर मुक्या जनावरांना ही सोडलं नाही तर विरार मध्ये चक्क पुराच्या पाण्यात 3 म्हशी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी येथील मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत वाहून जाणाऱ्या 2 म्हशीना वाचविले आहे.
पावसाचा हाहाकार! विरारमध्ये पुराच्या पाण्यात म्हशी वाहून गेल्या; धक्कादायक Video समोर pic.twitter.com/GXCBWBHQlR
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021
तर तिसऱ्या म्हशीचा शोध संध्याकाळ पर्यंत सुरू होता एकुणच गुरुवारी मोठया प्रमाणावर वसई विरार, नालासोपाऱ्यात पाऊस पडत होता आणि हा असा पावसाचा जोर रात्रभर कायम राहिला तर वसई सह आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही