पावसाने भातपीक गेले वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:26 AM2019-10-24T00:26:21+5:302019-10-24T06:05:19+5:30
मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला समस्यांचा डोंगर
बदलापूर : मुरबाड तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी केली. गेल्या दोन दिवसांपासून पडणाºया पावसामुळे मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापून ठेवलेले भातपीक वाया गेले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मतदान झाल्यावर सर्वच उमेदवार हे आराम करण्यासाठी अज्ञातस्थळी गेले आहेत. दोन दिवस आराम करून पुन्हा मतमोजणीला हजर राहण्याची तयारी सर्वच उमेदवार करत आहेत. मात्र, मुरबाड मतदारसंघातील आमदार यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुरबाडमधील शेतकºयांच्या नुकसानीचा पाहणी दौरा सुरू केला आहे.
मुरबाडमधील अनेक शेतकºयांनी दिवाळीपूर्वी भातपिकाची कापणी करून धान्य सुकविण्यासाठी शेतात ठेवले होते. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे हे सर्व धान्य पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुकलेल्या भागाला कोंब आले आहे. कोंब आलेले धान्य वाया गेले असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले
आहे.
ज्याज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यात्या शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी कथोरे यांनी अधिकाऱ्यांसह केली. यासंदर्भात जिल्हा कृषी विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. बुधवारी संपूर्ण दिवस कथोरे हे अधिकाºयांसह शेतकऱ्यांची भेट घेत होते. अधिकाºयांनीही मुरबाडमधील शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहे.
शेतकºयांची चिंता वाढली
अनगाव : परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भिंवडी तालुक्यात हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भात शेती आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पिक घेण्यात आले असून ते पिक तयार झाल्याने शेतकºयांनी दिवाळीपूर्वीच भातिपकाची कापणी करून ते घरात आणण्याची लगबग सुरू केली. मात्र परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात तरंगू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. लाप, अस्नोली, साईगांव, खानिवली, कवाड, सोनटक्के, दिघाशी, वाघिवली, अनगाव, पिळझे, देपोली, निवली, चिंचवली येथे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
आसनगाव : अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले असल्याने ती देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल भेरे यांनी तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खरीप हंगामातील तयार झालेल्या भातपिकांच्या कापणीचे काम सुरू करून भात कापणी करून भातपिक शेतात सुकण्यासाठी पसरवून टाकले असताना सध्या पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मतमोजणीत कर्मचारी गुंतलेले असल्याने शुक्र वारपासून पंचनामे करायला सुरूवात करावी अशी मागणी भेरे यांनी केली आहे.