दहावी नापास ते पैशांचा पाऊस!
By admin | Published: August 7, 2015 10:58 PM2015-08-07T22:58:23+5:302015-08-07T22:58:23+5:30
साखरे गावातील डंबाळे कुटुंबातील पाच लोक हे या प्रकरणातील आरोपी असले तरी तुकाराम ढवळे डंबाळे (३८) हा मुख्य आरोपी दहावी इयत्ता नापास झाल्याने
हितेन नाईक, पालघर
साखरे गावातील डंबाळे कुटुंबातील पाच लोक हे या प्रकरणातील आरोपी असले तरी तुकाराम ढवळे डंबाळे (३८) हा मुख्य आरोपी दहावी इयत्ता नापास झाल्याने शिक्षणासाठी २-३ वर्षे पुणे, नाशिक, इतरत्र फिरून आपण एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देत असल्याची बतावणी तो गावकऱ्यांना करी. उदरनिर्वाहाचे कुठलेच साधन संपूर्ण कुटुंबाकडे नसल्याने त्यांनी ओळखीवरून मानवाधिकार आयोगाचे विक्रमगड तालुकाध्यक्षपद मिळविले. त्याचा वापर करून त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेत माया गोळा करायला सुरुवात केली. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त कमाई होत नसल्याने झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून दुप्पट पैसे करून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, असे गोरखधंदे त्यांनी उघडले.
गेल्या अनेक वर्षांपासून साखरे गावच्या विठ्ठल मंदिराच्या मागील जंगलसदृश वनक्षेत्रातील निर्जनस्थानी तुकाराम डंबाळे, एकनाथ डंबाळे व प्रभू डंबाळे यांनी मोठे झोपडीवजा घर उभारले. पैसे डबल करून देतो, याची जाहिरात करण्यासाठी त्यांनी पालघर, डहाणू, वसई, नाशिकआदी भागांत टीम तयार केल्या होत्या. त्यांनी पैसे डबल करण्याच्या आमिषाने गिऱ्हाइके पाठवायची. याकामी एजंट लोकांचे कमिशन ठरलेले होते.
प्रथम गिऱ्हाइकाने एक लाखाची रक्कम जमा केल्यानंतर रात्री त्याच्या साखरे गावातील घरातील सर्व जमीन शेणाने सारवून घ्यायची. त्यावर मानवी सांगाडे, कवट्यांवर फुले, अबीर, गुलाल उधळून मंत्रविधी करायचा. याच वेळी घरावर कुटुंबातल्या व्यक्तीला लपवून गिऱ्हाइकाने दिलेल्या पैशांतील अर्धी रक्कम कौलातून हळूहळू खाली टाकायची. नंतर, संपूर्ण लाल झालेली नोट खाली टाकल्यानंतर अपशकुन झाला, असे ओरडून सांगत २-३ महिन्यांनी पुन्हा परत या, असे सांगून त्यांना परत पाठविले जायचे. याबाबत, लोकांच्या तक्रारी व पैसे मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने या सर्व कुटुंबांनी वनपट्टे मंजूर झाल्याच्या जंगलात निर्जनस्थानी झोपडी उभारली.
ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाड घातली तेव्हा तुकाराम डंबाळेच्या आईने ग्रामस्थांपुढे जात तुम्ही पोलिसांत तक्रार करून नका. तसेच पैशाचे आमिष दाखविल्याचे ग्रामस्थ सांगतात. परंतु, जनक्षोभ वाढू लागल्यानंतर हीच रक्कम ५ लाखांपर्यंत गेली. परंतु, आपल्या नातेवाइकांचे सांगाडे पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून उपस्थित २० ते २५ लोकांनी तेथून पळ काढला. या वेळी असलेल्या चार मोटारसायकली अजूनही त्या झोपड्याच्या आसपास उभ्या आहेत.
1प्रथम गिऱ्हाइकाने एक लाखाची रक्कम जमा केल्यानंतर रात्री त्याच्या साखरे गावातील घरातील सर्व जमीन शेणाने सारवून घ्यायची. त्यावर मानवी सांगाडे, कवट्यांवर फुले, अबीर, गुलाल उधळून मंत्रविधी करायचा. याच वेळी घरावर कुटुंबातल्या व्यक्तीला लपवून गिऱ्हाइकाने दिलेल्या पैशांतील अर्धी रक्कम कौलातून हळूहळू खाली टाकायची. नंतर, संपूर्ण लाल झालेली नोट खाली टाकल्यानंतर अपशकुन झाला, असे ओरडून सांगत २-३ महिन्यांनी पुन्हा परत या, असे सांगून त्यांना परत पाठविले जायचे.
2२-३ महिन्यांनंतर गिऱ्हाइकांच्या घरी जाऊन घराच्या कोपऱ्यात सारवून मंतरलेले मडके २-४ महिने ठेवा, पैसे वाढतील, असे सांगून वेळ मारून नेली जात होती. परंतु, पैसे वाढतच नसल्याने पैशांचा तगादा लावला जात असे. अशा वेळी तुम्ही अन्य दुसरे गिऱ्हाईक बघून द्या, असे सांगून पैशांचा व्यवहार मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. याबाबत, लोकांच्या तक्रारी व पैसे मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने या सर्व कुटुंबांनी वनपट्टे मंजूर झाल्याच्या जंगलात निर्जनस्थानी झोपडी उभारली. या झोपडीतून मागील अनेक वर्षांपासून जादूटोणा चालू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
पन्नास हजारांचे आमिष...
ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाड घातली तेव्हा तुकाराम डंबाळेच्या आईने ग्रामस्थांपुढे जात तुम्ही पोलिसांत तक्रार करून नका. मी तुम्हाला ५० हजार रु. देते, असे आमिष दाखविल्याचे ग्रामस्थ सांगतात. परंतु, जनक्षोभ वाढू लागल्यानंतर हीच रक्कम ५ लाखांपर्यंत गेली. परंतु, आपल्या नातेवाइकांचे सांगाडे पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून उपस्थित २० ते २५ लोकांनी तेथून पळ काढला. या वेळी असलेल्या चार मोटारसायकली अजूनही त्या झोपड्याच्या आसपास उभ्या आहेत. या वेळी किशोर सदानंद कुडू (संजाण-गुजरात), अमोल कुरांडे (रा. भिवंडी), भारती जसुधा जोसेफ (रा. पालघर), नंदकुमार मधुकर ठाकरे (वाडा), पांडुरंग किसन धापट (डोल्हारा-मोखाडा), जयश्री मोतीलाल पांचाळ (पालघर) घटनास्थळी असल्याची नावे ग्रामस्थांनी सांगितली. यातील नंदकुमार ठाकरे व पांडुरंग धापट यांना पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण डंबाळे कुटुंबीयांतील आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या दोन टीम तर विक्रमगड पोलिसांच्या २ टीम अशा चार टीम आरोपींचा शोध देत आहेत.
अंत्यसंस्काराच्या वेळी झाला जादूटोण्याचा भंडाफोड
पालघर-विक्रमगड तालुक्यांतील साखरेजवळील हनुमाननगरमधील काशिनाथ कांबडी (६५) या वयोवृद्धाचा मृत्यू ५ आॅगस्ट रोजी झाल्यानंतर त्यांच्यावर भुईडाग अंत्यसंस्कारासाठी (जमिनीत गाडणे) पिंजाळ नदीच्या किनाऱ्याजवळील स्मशानभूमीवर गेलेल्या ग्रामस्थांना तेथे ८-१० खड्डे खणलेले व त्यातून आपल्या नातेवाइकांचे मृतदेह उकरून काढल्याचे निदर्शनास आले. आपल्या नातेवाइकांच्या मृतदेहांच्या अवशेषांचा उपयोग कोण करू शकतो, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू असताना विठ्ठल मंदिराच्या मागील जंगलात एका निर्जनस्थानी गावातील तुकाराम ढवळू डंबाळी व त्याच्या दोन भावांनी जादूटोण्यासाठी मोठे झोपडे बांधल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या सर्व गोष्टीची शहानिशा करण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी एकजूट करून थेट डंबाळीच्या जादूटोण्याचा अड्डा गाठला.
या अड्ड्यावर झोपडीवजा घरात मांत्रिक डंबाळेसाठी वाघाच्या कातडीसदृश आसनव्यवस्था करण्यात आली होती. त्याच्यासमोर एक देवीची मूर्ती, पेटलेला होम, बाजूला एक मृतदेहाचा सांगाडा, ८ ते १० मानवी कवट्या ठेवून मंत्रोच्चार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. हे दृश्य पाहून स्मशानभूमीतून खड्डे खणून आपल्या नातेवाइकांचे सांगाडे व कवट्या त्यांनीच आणल्याची खात्री ग्रामस्थांची पटली. आपल्या नातेवाइकांच्या अस्थींचा वापर अशा अघोरी कामासाठी करण्यात येत असल्याचे पाहून गावातील माजी सरपंच मधुकर वनमाळी, लक्ष्मण चौधरी, मारुती ढवळू वाघेला, गोपाळ भडांगे आदी ग्रामस्थांनी सर्वांच्या सहमतीने या अघोरी प्रथेविरोधात उभे राहण्याचे ठरविले.
या वेळी तत्काळ विक्रमगड पोलीस स्टेशनचे पो.नि. सुनील नंदावळकर यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पोलिसांनी घेतलेल्या झडतीत मानवी अवशेष, वाघाचे कातडे, बनावट नोटांच्या बंडलांची गाठोडी, तलवारी, जिलेटीन हे ज्वालाग्राही स्फोटक आदी सामग्री सापडली. मात्र, पोलीस येण्याआधी या झोपडीत असलेले १५ ते २० लोक व दोन महिला पळून जाण्यात यशस्वी ठरले.