पावसामुळे जनजीवन विस्कळीत; किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, बाजारपेठ पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:17 AM2017-08-31T06:17:21+5:302017-08-31T06:17:28+5:30

गेल्या शनिवारपासून सुरु असलेल्या पावसाने मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास जोर पकडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

Rainfall disrupts life due to rain; Coastal alert alert, market water drain | पावसामुळे जनजीवन विस्कळीत; किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, बाजारपेठ पाण्याखाली

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, बाजारपेठ पाण्याखाली

Next

डहाणू : गेल्या शनिवारपासून सुरु असलेल्या पावसाने मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास जोर पकडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. शहरात चंद्रिका हॉटेल परिसर, इराणी रोड, प्रभूपाडा ,सतीपाडा, घाचीया परिसर पाण्याखाली गेला होता. पुरपरिस्थीतीची पाहणी करण्यासाठी रात्री ११ वाजता डहाणूच्या प्रांताधिकारी आंचल गोयल, तहसीलदार एन. सारंग डेरेदाखल होते.
मंगळवारी चारपासून आज पर्यंत २४ तासात १८७.६ मी.मी. तर २१४५ मी.मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. आंबेसरी पारसपाडा येथे नयना जाना गहला (५०) ही वृद्ध महिला शेतावरु न घरी परतत असताना नाल्यामध्ये वाहुन गेल्याची घटना घडली.
मुसळधार पावसामुळे चिंचणी खाडी किनारा आणि समुद्र किनाºयावरील घरे सुरक्षित ठीकाणी हलवण्यात आली. डहाणू खाडी किनाºयाची घरेही सुरक्षित ठीकाणी हलवल. साखरे धरण ओव्हर फ्लो झाल्याने आजु बाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गंजाड येथे राज्यमार्गावर झाड कोसळल्याने वाहतुक ठप्प झाली. गारवा हॉटेलजवळ राज्यमार्ग पाण्याखाली आल्याने रिक्षाचा अपघात घडला. तर मुंबई अहमदाबाद हायवेवर तुरळक वाहने धावत असल्याने महामार्गावर शुकशुकाट दिसून आला.
डहाणू शहरासह कंक्राटी, कोसबाड, कैनाड सह गंजाड चारोटी वेती अंबेसरी या गावात वादळी वाºयासह पावसाने धुमाकुळ घातला. रस्त्यावरुन नाले भरु न वाहू लागल्याने सर्वत्र पुर परिस्थीती निर्माण झाली आहे. किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर चिंचणी, तारापूर, वरोर, वाढवण, गु्गवाडा, डहाणु खाडी, सतीपाडा, चिखले या भागात मुसळधार पावसामुळे रहिवाशांच्या जीव टांगणीला लागला होता. सरकारी यंत्रणेकडून मदतीच्या प्रतिक्षेत होते. शहरात इराणी रोड, चंद्रीका हॉटेल आणी बाजारपेठही पाण्याखाली गेली होती. रेल्वे लाईन पाण्याखाली आल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमा झाली. तर अनेक प्रवासी रेल्वे स्थानकात अडकून पडले. लांब पल्ल्यांच्या ट्रेनला थबा देण्यात आला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
वाडा : संपूर्ण जिल्ह्यात गेला आठवडाभर पावसाची सुरू असलेल्या संततधारेमुळे सर्वत्र पूर परिस्थिती असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेते पाण्याने तुडुंब भरली आहेत. त्यामुळे हळवार भातशेतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्यात गेला आठवडाभर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू, विक्रमगड, वाडा या तालुक्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत कोसळलेल्या पावसामुळे शेते पूर्णपणे पाण्याने तुडुंब भरली होती. पावसाने जराही उसंत न घेतल्याने हे पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे हळवार भातशेतीला या पूराचा फटका बसेल असे दिसते.
यावर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरण्या लवकर केल्या आणि पाऊस चांगला असल्याने लागवडही वेळेत केली. भाताचे हळवार पीक हे ९० ते १२० दिवसा दरम्यान येत असते. हा कालावधी पूर्ण होण्यास अल्प अवधी राहिला असून अनेक शेतकºयांची हळवार भातपीके निसवली आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांत भातपीक हाताशी येईल अशी स्थिती असतांना मुसळधार पाऊस कोसळल्याने ही भातशेती गेले काही दिवस पाण्याखाली गेल्याने हळवार शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. गेली दोन- अडीच महिने पाऊस चांगला पडत असल्याने सुखावलेला बळीराजा मात्र गत आठवडाभर पावसाच्या सुरू असलेल्या संततधरेने चिंतेत सापडला आहे.

जव्हारमध्ये एकाचा बुडून मृत्यू
जव्हार : तालुक्यातील कोगदा येथील विनोद गणपत दळवी (२२) हा तरुण मंगळवारी सायंकाळी घरी परतत असतांना नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. तो शेतातील कामे आटपून घरी परतत असताना कोगदा गावाला लागून असलेल्या मोठ्या नाल्यात त्याचा पाय घसरला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपले होते. त्यामुळे नाल्यातिला पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्याचा मृतदेह बुधवारी नाल्याच्या शेजारी हरिश्चंद्र बरफ यांच्या घरा जवळ सकाळी १०.३० च्या दरम्यान आढळून आला. या संदर्भातील माहिती नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, नायब तहसीलदार जव्हार यांनी दिली.

वाहून गेलेल्यापैकी तिघांचे मृतदेह हाती
पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृष्यस्थिति निर्माण झाली होती. पुरात आणि समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. ह्या घटनेत एका लहान बालिकेसह महिलेचा समावेश असून २ लोक अजूनही बेपत्ता आहेत.मृतांमध्ये तनिष्का राम बालशी (५) रा. वेवूर- पालघर, नैना जाना गहला (५०) रा.आंबेसरी (पारसपाडा) डहाणू, राजेश नायर , जेनिस कंपनी बोईसर यांचा समावेश आहे. तर सुरोत्तम झा (२५) रा. नवली- पालघर व नरु वळवी (४५) रा.डहाणू यांचा शोध सुरु आहे.

वीजवाहिनी पडून म्हशीचा मृत्यू
पारोळ : विरार पूर्वेतील कणेर फाटा येथील सनी पाड्यात माळरानावर चरणाºया म्हैशीवर ओव्हरहेड वायर पडल्याने तिचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. यावेळी इतर म्हैशी व त्यांना चारणारे हे थोडे दूर असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची कणेर पोलीस चौकीवर माहिती दिल्याने महावितरणशी संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. या भागातील विद्युत पुरवठा करणारे अनेक पोल व तारा या जुन्या झाल्या असून वीज वितरण कंपनीने त्या त्विरत बदलण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

चाकरमान्यांनी घरीच राहणे केले पसंत
पालघर : जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू भागाला मंगळवारच्या मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. रेल्वे, बस सेवा ठप्प पडत अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गणपती बाप्पाला काळोखात रात्र घालवावी लागली. बुधवारी सकाळपासून वल साड एक्स्प्रेस, फ्लार्इंग राणी अश्या महत्वपूर्ण गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाश्यानी आज घरीच राहणे पसंत केले. मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजवला होता. सखल भागात पाणी साचून घरे ,दुकानांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे आपले संसार वाचिवण्याची लोकांची एकच तारांबळच उडाली.
मुंबईत झालेल्या मुसळाधार पावसाने रेल्वे स्थानके भरल्यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणाºया व गुजरातहून मुंबईकडे येणाºया गाड्या मंगळवारी संध्याकाळ नंतर बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. डहाणू ते वैतरणा पर्यंत रोज प्रवास करणारे चाकरमानी या पावसामुळे मुंबईतच विविध स्थानकांवर अडकून पडले होते. जिल्हाधिकारी यांना ही बाब कळताच त्यांनी प्रबंधकांशी चर्चा केली त्यांनतर विरारच्या पुढे थांबे देण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने मान्य करीत वांद्रे येथून सोडलेल्या भुज एक्सप्रेस गाडीत विरार ते डहाणू स्टेशनला थांबा दिला. ह्याच वेळी पालघर ते केळवे दरम्यान ( चिंतुपाडा) सिग्नल चा बिघाड पाहता ही गाडी थांबविण्यात आल्याने भर पावसात प्रवाश्यांनी चालत पालघर पर्यंत आपला पल्ला गाठला.
केळवा, सफाळे, पालघर, बोईसर येथून सर्वसामान्यांना एसटीने आसरा दिला. भर पावसातही बसेसने या प्रवाश्याना आपल्या स्थानकापर्यंत पोचिवण्याचे काम केले. मुंबई व गुजरात येथून कामानिमित्त पालघर येथे आलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. येथील अनेक सेवाभावी व सामाजिक संस्थांनी त्यांना राहण्याची व जेवणाची सोय करून माणूसकीचे दर्शन घडविले आहे. ह्या दमदार पावसात मात्र गणेश विसर्जनाच्या उत्साहात कुठेही कमतरता जाणवत नव्हती.

Web Title: Rainfall disrupts life due to rain; Coastal alert alert, market water drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.