खासदार राजेंद्र गावित यांची डहाणूत रॅली; शिवसैनिकांची उपस्थिती कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:15 PM2019-06-06T23:15:15+5:302019-06-06T23:15:24+5:30

शिवसैनिक कमी : भाजपा झाली नाराज

Rajendra Gavit's Dahanu Rally; Shivsainik's attendance is low | खासदार राजेंद्र गावित यांची डहाणूत रॅली; शिवसैनिकांची उपस्थिती कमी

खासदार राजेंद्र गावित यांची डहाणूत रॅली; शिवसैनिकांची उपस्थिती कमी

Next

डहाणू : भाजपाचे माजी खासदार अ‍ॅड.चिंतामण वनगा, यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असून, शिवसेना भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनात कोणतेही किल्मिष न ठेवता शिवसेना-भाजप युतीचे कार्य एकसंघपणे केल्यानेच, पालघर लोकसभा मतदारसंघातून, खासदार म्हणून मला निवडून दिल्याबद्दल, डहाणूतील मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानीत आहे, या निवडणुकीत पैसा आणि गुंडगिरीच्या बळावर निवडून येणाऱ्यांना, आता चाप बसला असून, कार्यकर्त्यांनी यापुढेही शिवसेना-भाजप युतीचे कार्य असेच सुरू ठेवून, विधानसभेतही विरोधकांना, त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन, पालघर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार, राजेंद्र गावित यांनी डहाणूतील मतदारांना केले.

डहाणू येथे नवनिर्वाचित खासदार, राजेंद्र गावित यांची पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून, विजयी झाल्याबद्दल शिवसेनेने, मतदार आभार रॅलीचे, आयोजन केले होते. यावेळी रॅलीला संबोधित करताना राजेंद्र गावीत बोलत होते, या रॅलीत आमदार अमित घोडा, आमदार पास्कल धनारे, नगराध्यक्ष, भरत राजपूत, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष, संतोष शेट्टी, शिवसेना जिल्हाध्यक्ष, राजेश शहा, नगरसेवक, संजय पाटील, नगरसेवक, जगदीश राजपूत, विशाल नांदलस्कर, आणि शेकडो कार्यकर्ते, रॅलीत सामील झाले होते, ही रॅली, डहाणू के.टी.नगर, पासून इराणी रोड, मसोली, आगर मार्गे, पारनाका अशी काढण्यात आली.

यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी महिला कार्यकर्त्यांना, शिवसेना भाजपच्या कोणत्याही कार्यकर्तीवर अन्याय झाल्यास, तो खपवून घेतला जाणार नाही, शिवाय शिवसेना भाजपच्या कार्यकरर्तीने एकमेकींच्या साथीने त्याचा मुकाबला करावा, असा सल्लाही दिला.

Web Title: Rajendra Gavit's Dahanu Rally; Shivsainik's attendance is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.