राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:51 PM2019-03-10T22:51:00+5:302019-03-10T22:51:06+5:30

पुराच्या आठवणीचा धसका; तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर

Rajvali Bay Cleanliness by April | राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

Next

वसई : जुलै महिन्यातील मुसळधार पावसात शहरातील पाणी वाहून न जाण्याचे मुख्य कारण राजवली खाडीतील मातीचा भराव व लोखंडी पूल ही कारणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तो अडथळा त्यावेळी दूर केला होता. मात्र चालू वर्षात जुलै २०१८ सारखी पूरपरिस्थीती पुन्हा उद्भवू नये म्हणून आतापासूनच राजवली खाडीतील गाळ काढण्यास व रूंदिकरणास पालिकेने सुरूवात केली आहे.

या कामासाठी तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर करण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. राजावली खाडीवरील अनिधकृत भरावं व बांधलेला पुलं व त्यामूळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन औद्योगिक वसाहतीचे झालेले १५० कोटीचे नुकसान, १२०० एकर मिठागरात पुराचा पाणी गेल्यामुळे झालेली करोडो रु पयांची हानी, राजावली खाडीत रसायनिमश्रित पाणी सोडले जात असल्याने होत असलेले प्रदूषण अशी अनेक कारणांमूळे राजावली खाडी प्रकाशझोतात आली होती.वसई विरार शहर महानगरपालिका शहर स्वच्छता विभागामार्फत विविध योजना प्रभावी पणे राबविल्या जात आहेत.पाण्याचा निचरा होऊन रस्त्यावर पाणी तुंबू नये याकरीता तसेच नाले सफाई करीता सन २०१९-२० मध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वसई-विरारमधील नाल्यांची एकूण संख्या १५० असून त्यांची लांबी १८७ किमी. आहे. या नालेसफाईसाठी खर्च गतवर्षी साडेचार कोटी रुपये होता.
छोट्या गटारांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असून नालेसफाईही पूर्ण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सांगितले होते.तरीही जुलै महिन्यातील पावसामूळे शहरातील नाल्यांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही व शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली.यावर्षी तशी परिस्थिती
पुन्हा उद्भवू नये म्हणून पालिका नालेसफाईवर लक्ष ठेऊन आहे.

तिवरांच्या झाडांना धक्का न लावता नालेसफाई
या अगोदर शहरांतर्गत नालेसफाईवर भर दिला जात होता. त्यावर पाच ते साडेपाच कोटी खर्च होत होता. मात्र, आता ज्या नाल्यांतून शहरातील पाणी खाडीला जाऊन मिळते त्या नाल्यांतील गाळ काढणे व खाडीचे रूंदिकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचा अतिरिक्त खर्च चार कोटी रूपयांच्या आसपास आहे. खाड्यांतील गाळ काढण्यासाठी पोकलन मशीन व तराफ्यांचा वापर करण्यात येत असून एप्रिल अखेरपर्यंत नालेसफाई केली जाणार आहे. वसई पूर्व येथील खाडी नायगांव पर्यंत साफ करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तिवरांची झाडे आहेत त्यांना धक्का न लावता नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.

Web Title: Rajvali Bay Cleanliness by April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.