शिरपामाळ येथे ध्वजारोहण करून रॅली

By admin | Published: February 20, 2017 05:10 AM2017-02-20T05:10:22+5:302017-02-20T05:10:22+5:30

शिवजयंती निमित्त, जव्हार तालुक्यातील शिवप्रेमी व जव्हार नगरपरिषद यांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी रविवार रोजी, जव्हार मधील गांधीचौक

Rally by flag hoisting at Shirpamal | शिरपामाळ येथे ध्वजारोहण करून रॅली

शिरपामाळ येथे ध्वजारोहण करून रॅली

Next

जव्हार : शिवजयंती निमित्त, जव्हार तालुक्यातील शिवप्रेमी व जव्हार नगरपरिषद यांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी रविवार रोजी, जव्हार मधील गांधीचौक येथे शिवजयंती जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी गांधी चौक येथे नगराध्यक्ष संदीप वैद्य, उत्सव समतिी सभापती कपिल तामोरे, मुख्याधिकारी विधाते, उपसभापति अमति अिहरे, यांच्या हस्ते शिव पुतल्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शिवाजी महारांजा सुरवीर कसे झाले, महाराज होते कसे, व त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन कसा केला? या विषयी माहिती देण्यासाठी, शिव अभ्यासक परब यांना बोलाविण्यात आले होते, या विश्लेषकांनी येथील तरु णांना शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदवी स्वराज्य विषयी माहिती देण्यात आली.
शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करण्यासाठी निघाले तेव्हा, जव्हार शहरापासून १ कि.मी. अंतरावर असलेले माळरानावरील सर्वात उंच ठिकाण व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली टेकडी ते ‘’शिरपामाळ’’ येथे त्यावळी महाराजांनी मुक्काम ठोकला होता. ते ठिकाण म्हणजेच शिरपामाळ. येथे आज शिवजयंती निमित्त जाऊन शिवप्रेमींनी ध्वजारोहण केला. गावभर मोटार सायकल रॅली काढली.
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य विषयी माहिती देण्यासाठी शिव अभ्यासक परब यांना बोलाविण्यात आले होते. त्यांनी काही वेळातच महाराजांचा हिंदवी स्वराज्य काय या विषयी येथील तरु णांना इतिहास व शिवाजी महाराजांनची माहिती देवून तरु णांची मने जिंकली शिवजयंतीचा कार्यक्र म मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी जव्हार नगरपरिषद, मुख्याधिकारी वैभव विधाते, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, चित्रागण घोलप, माजी नगरसेवक रियाज मणियार, समिती अध्यक्ष कपील तामोरे अन्य नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी, शेकडो इतिहास प्रेमी नागरिक, इतिहास विश्लेषक, व मान्यवर यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Rally by flag hoisting at Shirpamal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.