वाड्यामधील व्यापा-यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांना रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:37 PM2017-12-03T23:37:00+5:302017-12-03T23:37:16+5:30
प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे
वाडा : प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे येथील व्यापाºयांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या दुकानाबाहेर तसे फलक लावून प्लास्टिकच्या पिशव्याविरोधातील मोहीम तिव्र केली आहे.
प्लास्टिकपासून पर्यावरणाला अधिक धोका असल्याने शहरातील ‘आपला वाडा सोशल गृप’ ह्या व्हाट्सप गृपने याबाबत जनजागृती करत प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत येथील व्यापारी वर्गातील काही प्रमुख मंडळींनी प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचना दर्शवणारी फलके व भित्तीपत्रके आपल्या दुकानानबाहेर लावली आहेत. व्यापाºयांच्या या निर्णयाचे वाडा शहरातील नागरिकांकडूनही स्वागत होत आहे.
वाड्याच्या समस्या प्रशासना पर्यंत पोहचवण्यासाठी व त्यावर तातडीने उपाययोजना व्हावी या दृष्टीने ‘आपला वाडा’ या व्हॉट्स अॅप गृपच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी व व्यापाºयांसाठी प्लास्टिक पिशवी समस्येविषयी चर्चा घडविण्यात आली होती. त्यावर व्यापाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्लॅस्टिक पिशवीमुळे होणाºया दुष्परिणामांची जाणीव आहे. ‘आपला वाडा’ या सोशल गृपने घेतलेल्या भूमिकेचे एक व्यापारी म्हणून मी स्वागत करीत असून ग्राहकांनीही यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
- मधुकर महाजन, व्यापारीप्लास्टिकच्या पिशवीचा नष्ट व्हायल शेकडो वर्ष लागतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तिच्या वापरावर बंदी घालण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करत व्यापारी व जनतेला आवाहन केले. त्याला व्यापाºयांनी प्रतिसाद दिला हे स्वागतार्ह आहे.
- विशाल मुकणे, ग्रूप अॅडमिन,
आपला वाडा सोशल गृप