रॅम्प ब्रीजसाठी २७ दुकानांवर येणार गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:45 AM2019-02-23T01:45:10+5:302019-02-23T01:45:35+5:30
विरार पूर्व शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सद्या डोकेदुखी बनत चालला आहे.
वसई : विरार शहराला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या सद्याच्या उड्डाणपूलाला जोडून विरार पूर्व भागात रॅम्प ब्रीज (जोड उतार पूल) बांधण्याचे काम २०१५ साली मंजूर झाले होते. हा पूल पालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहे. मात्र या मार्गातील २७ दुकानांचे अडथळे दुर करण्याचा निर्णयÞ पालिकेने महासभेत जाहीर केल्याने या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. विश्वासात न घेता, कुठलेही लेखी आश्वासन न देता पालिकेने हा निर्णयÞ परस्पर कसा घेतला असा सवाल या दुकानदारांनी केला आहे. जोडउतार पूलाला विरोध नाही , मात्र दुकानांचे स्थलांतर संमतीशिवाय केल्यास आमचा विरोध असेल असा पवित्रा दुकानदारांनी घेतला आहे.
विरार पूर्व शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सद्या डोकेदुखी बनत चालला आहे. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचावा, वाहतूक कोंडी टाळावी यासाठी पालिकेने शहरातील उड्डाणपूलाला जोडून नवा जोड उतार पुल बांधण्याचे निश्चित केले आहे. सद्या असलेल्या उड्डाणाला जोडणारा हा पूल थेट पालिका मुख्यालयासमोर उतरणार आहे. हा पूल २२० मीटर लांबीचा असून तो ७ मीटर रु ंद असणार आहे. त्याचा खर्च ८ कोटी रु पये आहे. विरार शहरातील पूर्व आण िपश्चिमेला जोडणार्Þया उड्डाणपूलाला जोड पूल बनविण्याच्या कामाला२०१५ मध्ये मंजुरी मिळाली होती. सध्याच्या उड्डाणपूलावरून विरार पुर्वेला हा जोड पूल पालिका मुख्यालयाच्या दिशेने उतरविला जाणार आहे. यामुळे विरार शहरातील नागरिकांना आता पर्ु्व पश्चिमेला जे-या करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. ज्या ठिकाणी हा जोडपूल बनविला जाणार आहे, त्या ठिकाणी असलेल्या बाजारातील मंदिरासमोरील २७ दुकाने बाधित होणार आहे. पालिकेने नुकत्याच झालेल्या महासभेत ही २७ दुकानांच्या स्थलांतरांचा मार्ग मोकळा झाल्याचे जाहीर केले होते.
त्यांना हलविणार
नियोजित रॅम्प ब्रीज (जोड उतार पूलासाठी रेल्वेमार्गालगतची पालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने असलेली २७ दुकाने हलविण्यात येणार आहेत. यात तयार कपड्याची दुकाने, ज्वेलर्स, पादत्राणे, होलसेल व्यापारी, भांडी विक्र ेते, हार्डवेअर सामान विक्र ेते, कपडे ड्राय क्लिनर, टिव्ही रिपेअरींग, रसवंतीगृह अशी दुकाने आहेत.
तेथील दुकानदारांशी चर्चा करूनच हा निर्णयÞ घेतला आहे. या दुकानदारांना पालिकेच्या बाजारपेठेत तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी ८ गाळे बनवून देण्यात आले आहेत. पूल तयार झाल्यानंतर पालिकेतर्फे त्यांना रेखांकने करून देण्यात येईल आणि ते स्वखर्चाने पुलाखाली आपली दुकाने बनवतील.
- सुदेश चौधरी, सभापती,
स्थायी समतिी