पन्नास लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा, व्याजाने दिले पैसे, ८० लाखांची वसुली केल्यानंतर केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 06:16 AM2017-12-02T06:16:24+5:302017-12-02T06:16:26+5:30
पालघर तालुक्यातील पालघर पूर्व येथील दिवाण अँड सन्स उद्योग मधील एका कंपनी मालकाकडून ५० लाख रु पयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पालघरमधील अंबालाल गंभीरलाल जैन याच्याविरु द्ध पालघर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पालघर : तालुक्यातील पालघर पूर्व येथील दिवाण अँड सन्स उद्योग मधील एका कंपनी मालकाकडून ५० लाख रु पयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पालघरमधील अंबालाल गंभीरलाल जैन याच्याविरु द्ध पालघर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
दिवाण अँड सन्स उद्योग भागामध्ये स्वत:ची संदीप इंडस्ट्रीज नामक केमिकल कंपनीचे मालक संदीप मोदी यांनी आरोपी अंबालाल जैन यांच्याकडून २०१२ व २०१३ साली ३७ लाख रु पये उसनवारीने घेतले होते. मोदी यांचेकडून अंबालाल जैन याने कोणताही परवाना नसताना दिलेल्या रक्कमेवर अवैध पद्धतीने दरमहा १ लाख ७० हजार अशी ५ टक्के दराने व्याजाची रक्कम मागितली.
मोदी यांनी गेल्या सात वर्षात दरमहा १ लाख ७० हजारप्रमाणे ८० लाखाची रक्कम अंबालाल यास आजतागायत दिलेली आहे व पुढच्या वर्षभरात मोदी यांनी ३० लाख रु पये एकरकमी देऊन हा हिशोब संपवून टाकीन असे जैन यास कबूल केले होते. मात्र अंबालाल याने मोदी यांच्या कंपनीत जाऊन त्यांना धमकी देऊ लागला व मोदी यांच्याकडून अतिरिक्त ५० लाख रु पयाची मागणी करू लागला व ती रक्कम न दिल्यास तुझ्या विरोधात माझ्या पत्नीची छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी अंबालाल याने मोदी याना दिली.
अंबालाल याच्या जाचाला कंटाळून मोदी यांनी पालघर पोलिसांकडे धाव घेतली व पालघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासणीत पालघर पोलिसांना तथ्यता आढळताच पोलीस निरीक्षक किरण कबाडी व त्यांच्या सहकार्यांनी आरोपी अंबालाल जैन यास त्याच्या घरातून गुरु वारी अटक केली.
तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा...
आरोपी अंबालाल जैन याच्या विरु द्ध आधीही गुन्हे दाखल असल्याचे व तो गुन्हेगार प्रवुत्तीचा असल्याचे पोलिसांनी म्हटले असून त्याच्याविरु द्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. अंबालाल जैन यांच्या विरोधात पालघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.