गरोदर मातांच्या ताटात निकृष्ट आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:45 AM2019-02-27T00:45:56+5:302019-02-27T00:46:00+5:30

अंगणवाडीतील कथा अन व्यथा : अंडी, केळी एवजी मिळतो फक्त डाळ-भात, तक्रारींकडे दुर्लक्ष

Rare diet in pregnant mothers' table | गरोदर मातांच्या ताटात निकृष्ट आहार

गरोदर मातांच्या ताटात निकृष्ट आहार

Next

- हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क


जव्हार : जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण भागातील कुपोषणाचा आलेख कमी करण्यासाठी व कुपोषणाचे मुळ कारण म्हणजे गरोदर मातांना नियमित सकस व सदृढ आहार मिळावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासनाकडून गरोदर मातांचे वजन वाढविण्यासाठी अंगणवाडीत अंडी, केळी व चांगला आहार देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अंगणवाडी केंद्रात या गरोदर मातांना चक्क भात व साधी भाजी दिला जात असल्याचे समोर आले असून अंगणवाडीतील गरोदर मातांनी बालविकास अधिकाऱ्यांकडे तक्र ार केल्याचे सांगितले.


भुरीटेक पैकी मसनेवाडी येथील दुर्लक्षति अंगणवाडीत जवळपास ७ महिने ते ६ वर्षापर्यंत एकूण ३२ विद्यार्थी अंगणवाडी केंद्रात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तर याच मसनेवाडी अंगणवाडी केंद्रात एकूण ८ गरोदर मातांना आहार दिला जात आहे. मात्र, या केंद्रातील गरोदर मातांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याची तक्र आहे. याकडे लक्ष घालण्याची मागणी गरोदर माता व ग्रामस्थ यांनी केली आहे.
तालुक्यातील भुरीटेक पैकी मनसेवाडी अंगणवाडी केंद्रातील गरोदर मातांना साधी डाळ, भात देण्यात येत असल्याचे गरोदर मातांनी सांगितले. तसेच, या अंगणवाडी केंद्रात अंडी, केळी, असा सकस आहार कधी दिल्याचे आठवत नाही असेही गरोदर मातांनी सांगितले. कुपोषण कमी व्हावे म्हणून शासन प्रयत्न करून गर्भार काळापासून नियमित आहार देणे, त्या गरोदर मातांची वेळोवेळी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करणे, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न सरु आहे.

आदिवासी ग्रामीण भागातील अंगणवाडीतील महिलांना दिल्या जानाऱ्या सुविधा वेळेत मिळत नसल्याने शासनाचा उद्देश विफल ठरत आहे. भुरीटेक ही ग्रामपंचायत शहापूर तालुक्याला लागून असलेले शेवटचे टोक आहे. दºयाखोºयातील आदिवासी लोकवस्ती असलेला परिसर आहे. या भुरीटेक पैकी मसनेवाडी या अंगणवाडी केंद्राला बालविकास अधिकारी किवा मुख्यसेविका यांनी भेटी तर दिल्या नाही.
मात्र येथील गरोदर मातांना दिल्या जाणाºया आहाराची चौकशी कधी केली नसल्याचे गरोदर मातांनी सांगितले. त्यामुळे मसनेवाडी या अगंणवाडी केंद्राकडे बालविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे त्या गरोदर मातांनी बोलतांना सांगितले. जिल्हाधिकाºयांनी येथे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
 

आमच्या मसनेवाडी अंगणवाडी केंद्रात गेल्या काही महिन्यापासून आम्हा गरोदर मातांना साधा डाळ, भात दिला जातो. आम्ही अनेक वेळा अंगणवाडी कार्यक्र र्ती यांना सांगितले. परंतु तरीही तसाच आहार आम्हला मिळत आहे.
- रत्ना जगदीश वाघचौरे.
मसनेवाडी अंगणवाडी केंद्र
गरोदर माता

Web Title: Rare diet in pregnant mothers' table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.