ढगाळ वातावरणाचा फटका, रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:39 PM2019-12-25T23:39:25+5:302019-12-25T23:39:36+5:30

जिल्ह्यात रिमझिम : रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त, सुक्या मच्छीचे उत्पादन घटणार

A rash of cloudy weather, rabbis in distress, farmers worried | ढगाळ वातावरणाचा फटका, रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त

ढगाळ वातावरणाचा फटका, रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त

Next

डहाणू/बोर्डी : दिवाळीपर्यंत कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या धक्क्यातून सावरून उमेदीने रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उमेदीवर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आणि पावसाने पाणी फेरले आहे. बुधवार, २५ डिसेंबरच्या पहाटे साडेचार ते पाच दरम्यान डहाणू तालुक्यात सुमारे वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची आणि भाजीपाला पीक तसेच सुकी मच्छीच्या व्यवसायावरही परिमाण होणार आहे.

जमिनीत ओलावा असल्याने यंदा तशीही रब्बी हंगामाला उशीरा सुरुवात झाली. तालुक्यात मिरची हे प्रमुख नगदी पीक असून त्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवडीच्या पहिल्या टप्प्यात शेतकºयांना कीटकनाशक फवारणीवर खर्च करावा लागत आहे. वांगी, भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकावरही याचा परिणाम होईल. जिल्ह्याच्या काही भागात आंबा मोहरण्यास प्रारंभ झाला आहे. काही ठिकाणी वाटाण्याच्या आकारातील फळे धरली आहेत. याचबरोबर सफेद जांबूला फळगळतीचा धोका संभवू शकतो. तर लिची फळाच्या मोहराची प्रक्रिया याच कालावधीत होत असल्याने भुरी आणि डावणी आदींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याकरिता प्रती लिटर १ ग्रॅम याप्रमाणे कार्बनडेझिम हे बुरशीनाशक फवारावे, अशी माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी दिली. हा तालुका सुकी मच्छीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: धाकटी डहाणू येथे बोंबील, जवळा आदी मच्छी सुकविण्याचे काम केले जाते. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने वाळत टाकलेल्या माशांचे नुकसान झाले होते. हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहिले आणि अवकळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होऊन व्यावसायिकांवर मोठा परिमाण होऊ शकतो. तर पावळी आणि गवत व्यापारावरही पुन्हा एकदा संकट ओढवून दुग्ध व्यवसायावर टांगती तलवार आहे. पहाटे झालेल्या पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण आणि गारठा असल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवली. घशाचे विकार, दमा, सर्दी आणि खोकला हा त्रास मुले, ज्येष्ठांना सहन करावा लागला. वर्ष सरेपर्यंत टप्प्या-टप्प्याने पाऊस पडतोच आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेला पाऊस आता जि.प. आणि पं.स. निवडणुकीच्या दरम्यानही सोबत असल्याचा प्रत्यय येतो आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण
विक्रमगड : दोन ते तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून हवामान ढगाळ आहे. यामुळे भाजीपाला, आंबा या पिकावर परिणाम होऊ शकतो असे शेतकºयांचे मत आहे. या वातावरणामुळे काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने गवत व विटभट्टी व्यापाºयांची भाती वाढली आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीतून तरी काही हाती लागेल अशी त्यांची अपेक्षा आहे.

कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट, भाजीपाला, कडधान्य व फळपिकांचे नुकसान
च्वाडा : गेला आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाला, कडधान्य तसेच फळ पिकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

च्तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कूपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्याचे तसेच फळ पिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र, गेला आठवडाभर ढगाळ वातावरण असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्य यांवर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगांचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

च्आंबा व काजू या फळांचा मोरही ढगाळ वातावरणामुळे हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वाडा तालुक्यातील भाजीपाला कडधान्य व फळ पिकांचे झाले असून त्यांचे पंचनामे करून त्याना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title: A rash of cloudy weather, rabbis in distress, farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.