रणमंडळास दसऱ्याचे तोरण
By admin | Published: October 13, 2016 03:16 AM2016-10-13T03:16:33+5:302016-10-13T03:16:33+5:30
किल्ले वसई मोहिमेच्या शिलेदारांनी विजयादशमीच्या मुहूर्ताचे औचित्य साधत स्वराज्याच्या रक्षणासाठी शतकानुशतके तटस्थपणे देशाचे संरक्षण करणाऱ्या गडकोटांना
विरार : किल्ले वसई मोहिमेच्या शिलेदारांनी विजयादशमीच्या मुहूर्ताचे औचित्य साधत स्वराज्याच्या रक्षणासाठी शतकानुशतके तटस्थपणे देशाचे संरक्षण करणाऱ्या गडकोटांना संवर्धन, अभ्यासमोहीम, तोरण पूजनाने वसईतील ऐतिहासिक वसई किल्ल्याच्या रणमंडळास मानवंदना देण्यात आली. मंगळवार (दि. ११) रोजी जंजिरे वसई किल्ल्याच्या मूख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली. ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या पाऊलखूणा आहेत. याची जाणीव ठेवून किल्ले वसईच्या सदस्यांकडून अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ रणमंडळ पुजण्यात आले. मुख्य द्वारावर तोरण व बालेकिल्ल्याच्या बुरु जांवर भगवे निशाण तसेच भगव्या तोरणांची सजावट करण्यात आली. किल्ले वसई मोहीमेअंतर्गत गेली १३ वर्षे हा उपक्र म आयोजीत केला जातो.
सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत हा उपक्रम राबवीला गेला. किल्ले वसई मोहीम परिवाराचे २० प्रतिनिधी यात सहभागी झालेले होते. जंजिरे वसई किल्ल्याच्या पूजनासोबत समुद्रदेवतेचे पूजन करण्यात आले. यावेळी जानेवारी २०१६ सालापासून जंजिरे वसई किल्ल्याच्या बुरुजांच्या संवर्धन मागोवा घेण्यात आला. गडकिल्ल्यांच्या गौरवशाली परंपरा जपण्याच्या वारसा येणाऱ्या पिढीस प्रामाणिक इतिहासाची साक्ष देईल यात शंका नाही. विजयादशमीच्या निमित्ताने एकत्र जमलेल्या प्रतिनिधींनी रणमंडळातील धोकादायक परिस्थितीची पाहणी केली. (वार्ताहर)