नालासोपाऱ्यात रमजान ईदसाठी पोलीस प्रशासन बंदोबस्तासह सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:06 PM2019-06-04T23:06:52+5:302019-06-04T23:06:56+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत : १४ मशीदी २३ मदरसे
नालासोपारा : मुस्लिम समाजाचा पवित्र महिना रमजान सुरु असून ५ जूनला होणाºया ईदसाठी नालासोपारा शहरातील पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. येथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असून कोणताही अनुचित प्रकार घडून रमजान ईदच्या पवित्र सणाला गालबोट लागू नये म्हणून नालासोपारा आणि तुळींज पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.
नालासोपारा पश्चिमेकडे १४ मशीदी असून या सर्व ठिकाणी रमजान ईदच्या दिवशी नमाज पढला जाणार आहे. याकरिता नालासोपारा पोलीस प्रत्येक मशीदीच्या बाहेर १ अधिकारी आणि २ पोलीस तैनात करणार आहेत. तसेच सिव्हिक सेन्टर, बुºहाण चौक, साईनाथ नगर, समेळ पाडा, धनंजय स्टॉप, टाकी रोड, हनुमान नगर, श्रीप्रस्था, निळेगाव याठिकाणी २-२ पोलीस याठिकाणी तैनात करणार आहेत. तसेच नाकाबंदी केली जाणार असून पेट्रोलिंग होणार आहे. तर तुळींज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये १४ मशीदी आणि २३ मदरसे आहेत. मशीदीच्या परीसरात १ अधिकारी आणि ५ पोलीस तर मदरशाच्या ठिकाणी २-२ पोलीस बंदोबस्तासाठी ठेवणार असून मोठ्या मशीदीच्या ठिकाणी १ अधिकारी आणि १० पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहे.
रमजान ईदसाठी ६ अधिकारी, ४३ पोलीस, आरसीबी प्लॅटून आणि एस आर पी प्लॅटूनचे जवानही बंदोबस्तासाठी राहणार आहेत. अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले असून नाकाबंदी केली जाणार आहे. - वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)
रमजान ईदसाठी १० पोलीस अधिकारी, 90 पोलीस आणि आर सी बी प्लॅटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. हद्दीत पेट्रोलिंग व २ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच मुख्य मुख्य नाक्यावर पोलीस तैनात ठेवणार आहे. - राजेश जाधव, पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे