बापूंच्या स्वप्नातील भारताचे वास्तव चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:45 AM2018-10-02T05:45:30+5:302018-10-02T05:45:59+5:30
गांधींनी शिकवलेल्या श्रमप्रतिष्ठेचे धडे ग्रामीण भागात आजही गिरवतांना पहावयास मिळत आहेत. त्याचे मूर्तिमंत उदाहरण चिखले गावातील विजयवाडी वस्तीत पाहायला मिळते.
बोर्डी : गांधींनी शिकवलेल्या श्रमप्रतिष्ठेचे धडे ग्रामीण भागात आजही गिरवतांना पहावयास मिळत आहेत. त्याचे मूर्तिमंत उदाहरण चिखले गावातील विजयवाडी वस्तीत पाहायला मिळते. डहाणूच्या किनारपट्टी भागात बापूंचा हा वारसा जपला जात आहे. या वस्तीतील माह्यावंशी समाजाचा परंपरागत व्यवसाय बुरु डकाम आहे. मुख्यत: महिलावर्ग बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवितात. त्यामुळे श्रमप्रतिष्ठेचे धडे बालवयात मिळत असल्याने थोडासा उसंत मिळाला की, आई प्रमाणेच मुलीही विविध वस्तू बनविण्यास हातभार लावतात.
हस्तकलेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेचे धडे
महात्मा गांधीजींनी नागरिकांच्या उद्धाराकरिता हस्तकला आणि मुलोद्योगकाच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेचे धडे दिले. पूर्वी शाळा-शाळांमधून चरख्यावर विद्यार्थी सुत कातायचे.
मंगळवार २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची १५० वी जयंती आहे. बापूंचा हा वारसा जपून या विद्यार्थिनींनी खर्या अर्थाने त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यात महत्वाचा वाटा उचलला आहेत.