जिल्हाप्रमुखांच्या मध्यस्तीने बंड शमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:00 AM2018-01-20T01:00:55+5:302018-01-20T01:01:00+5:30
शिवसेनेतील वरिष्ठ नेते दाद देत नसल्याने झेंडा बदलण्याच्या तयारीत असलेल्या तालुका प्रमुख, सभापती आणि
मोखाडा : शिवसेनेतील वरिष्ठ नेते दाद देत नसल्याने झेंडा बदलण्याच्या तयारीत असलेल्या तालुका प्रमुख, सभापती आणि पदाधिकाºयांच्या सामुहिक राजिनाम्याच्याच्या तलवारी नवनियुक्त जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्या मध्यस्थीमुळे म्यान झाल्या आहेत. शुक्रवारी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बैठकीत अचानकपणे शहा यांनी अगंतुक प्रवेश केल्याने बैठकीचा रागरंगच पालटला.
शहा यांनी नाराजांना समजावून घेतले तसेच शिवसेना एक कुटुंब असल्याची समजुत काढून लवकरच पक्षांतर्र्गत समस्या सोडवू असे आश्वासन दिल्याने मोखाडा शिवसेनेचे बंड तर्तास थंडावले आहे. नाराजांच्या रांजेत तालुका प्रमुख अमोल पाटील, सभापती प्रदीप वाघ, विक्र मगड विधानसभा प्रमुख प्रल्हाद कदम यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रल्हाद कदम, प्रदिप वाघ, अमोल पाटील यांनी आक्रमक पणे पक्षांतर्गत राजकारणावर सडकून टिका केली. तर झेडपी सदस्य प्रकाश निकम यांनी नव्या जिल्हाप्रमुखांचे स्वागत करीत शिवसेनेवर आमचा विश्वास असून शिवसैनिकावर अन्याय होत असेल तर पहीला राजीनामा माझा असेल असे त्यांनी सांगितले. तर यावेळी जेष्ठ शिवसैनिक व जव्हार न. प.चे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी शिवसेना हे एक कुटुंब असून ही बंद मुठ आहे यामुळे नाराजी व्यक्त केली तर हरकत नाहीच मात्र पक्षाला धक्का वगैरे खरा शिवसैनिक देणार नाही असे भावुक आवाहन केले.