ऐनदिवाळीत मजुरांवर संक्रात, रोजगार हमीची पाठ, जीएसटीमुळे शहरांचे दरवाजे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:09 AM2017-10-23T03:09:31+5:302017-10-23T03:09:45+5:30

पावसाने शेवटी शेवटी घात केल्याने येथील आदिवासी शेतक-याचे अक्षरश: कंबरडे मोडले असून शेतमजुरांवरही ऐन दिवाळीमध्ये संक्रात आली आहे.

Recognition of employment in the winter season, employment guarantee, closed city doors due to GST | ऐनदिवाळीत मजुरांवर संक्रात, रोजगार हमीची पाठ, जीएसटीमुळे शहरांचे दरवाजे बंद

ऐनदिवाळीत मजुरांवर संक्रात, रोजगार हमीची पाठ, जीएसटीमुळे शहरांचे दरवाजे बंद

Next

हुसेन मेमन
जव्हार : पावसाने शेवटी शेवटी घात केल्याने येथील आदिवासी शेतक-याचे अक्षरश: कंबरडे मोडले असून शेतमजुरांवरही ऐन दिवाळीमध्ये संक्रात आली आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून कामे मिळत नाहीत त्यामुळे घरात आहे ते धान खाऊन आला दिवस ढकलला जात आहे.
तालुक्यातील एकुण लोकसंख्येचा विचार करता सरकारी नोकरवर्ग व स्थानिक व्यापारी वगळता आदिवासी समाज मोठ्या संख्येने पहावयास मिळतो. शेती हा मुख्य व्यवसाय असून शासकीय योजनांचा मोठा आर्थिक आधार असतो. शेतीचा हंगाम संपला की, शहराकडे जाऊन रेती बंदर, इमारत बांधणी व्यवसाय व विविध कं पन्यामध्ये किरकोळ कामे केली की पोटा पुरते मिळते व गावी पाठवालया काही पैसे शिल्लक राहतात. मात्र, जीएसटीमुळे शहरी भागातील व्यवसाय रोडावल्याने येथील बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगाराबाबत जिल्हाधिकारी, संबंधित यंत्रणा, प्रकल्प कार्यालय यांनी कोणतेही पाऊल न उचलल्याने हाताला काम नाही, पावसाने दगा दिला आणि शहराकडे जीएसटीचा फटका बसल्याने आर्थिक पेच आहे. दिवाळी सणाकरीता किराणा सामान, कपडे, चप्पल, घराला रंगरंगोटी आदी वस्तू खरेदी करीता बाजारपेठ सज्ज होत्या. मात्र यंदा दुकानदारांनीही मालाचा साठाही कमी केला होता.
>व्यापाºयांना होता मंदीचा अंदाज : जव्हार तालुक्यात मंदीचे वातावर असल्याचा अंदाज व्यापाºयांना होता. त्याचा धंदा पुरेपुर या खेडोपाड्यातील आदिवासी बांधवावर अवलंबून होता व त्यांना रोजगार नसल्यामुळे यंदाची दिवाळी आंधारातच जाणार त्यामुळे व्यापारी वर्गानेही माल कमी प्रमाणात खरेदी केले होता. असल्यामुळे बाजारपेठही मंदावला आहे.

Web Title: Recognition of employment in the winter season, employment guarantee, closed city doors due to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी