वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा रेकोर्ड ब्रेक 321 मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 10:39 PM2020-07-09T22:39:13+5:302020-07-09T22:42:11+5:30
गुरुवारी वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा चौथ्या दिवशी देखील सर्वाधिक कमी असे 211 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने . त्यामुळे आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 7022 वर पोहचली
वसई -विरार शहरात पुन्हा चौथ्या दिवशी गुरुवारी रेकॉर्ड ब्रेक असे 321 रुग्णाना घरी सोडण्यात आले असून ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे. तर शहरातील केवळ 211 रूग्ण हे कोरोना बाधित म्हणून आढळून आले तर वसई - नालासोपारा मधील 6 रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
दरम्यान गुरुवारी वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा चौथ्या दिवशी देखील सर्वाधिक कमी असे 211 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने . त्यामुळे आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 7022 वर पोहचली असून शहरात एकूण 2554 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये वसई - 68 नायगाव -6 वसई-विरार- 6 नालासोपारा- 72 आणि विरार- 59 तसेच यात एकूण 72 पुरुष व 59 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.
तर पालिका हद्दीत 6 रुग्णाचा मृत्यू !
वसई विरार महापालिका हद्दीतील वसई - 4 आणि नालासोपारा मधील 2 असे मिळून एकूण 6 रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 140 इतकी झाली आहे .
दिलासादायक ; रेकोर्ड ब्रेक चौथ्या दिवशी देखील 321 मुक्त ;
वसई विरार शहरात चौथ्या दिवशी देखील रेकोर्ड ब्रेक असे 321 रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे.
मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णाची एकुण संख्या 4328 वर पोहचली आहे.