बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By admin | Published: March 28, 2017 05:12 AM2017-03-28T05:12:30+5:302017-03-28T05:12:30+5:30

सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या

A record crop of tomato on borer water | बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

Next

वसंत भोईर / वाडा
सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टॉमेटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. टॉमेटेची शेती लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.
डोंगराच्या कुशीत वसलेले देवघर हे एक खेडेगाव. या गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव, कालवा नाही. मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भातपिकानंतर येथील शेतकरी टॉमेटेची लाभदायक शेती करीत आहेत.
टॉमेटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वत:च रोप तयार करतात व त्याची लागवड करून रोपे उरली तर त्यांची विक्रीसुद्धा करतात. सर्वप्रथम भातपीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये त्यात त्याची लागवड केली जाते. साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळ तोडणी झाली तर पुढचे फळ व्यवस्थित होते. एका एकरातून १५०० क्रेट टॉमेटे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रु पये खर्च येतो. मात्र जसा बाजारभाव असेल त्या प्रमाणे नफा-तोटा होतो. या वर्षी प्रति क्रेटला ४०० रूपये भाव मिळत असल्याने एकराला चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.
अलंकार या जातीच्या वाणाची लागवड येथील शेतकरी मोठयÞा प्रमाणात करतात. कारण हे फळ मोठे असते व उष्णतेत ते टिकते. साधारणपणे पंधरा दिवसांपर्यत या फळाला काहीही होत नाही. त्यामुळे या वाणाला बाजारात जास्त मागणी आहे. बुधाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या चार एकर अशा विस्तीर्ण जागेत टॉमेटे शेती केली आहे. संपूर्ण जागेत ठिबक सिंचन केले असून औषधेही ठिबक सिंचनातून दिली जातात.

येथील जमीन टोमॅटोसाठी अत्यंत उपयुक्त
या पिकाला फारशी मशागत करावी लागत नाही तसेच ठिबक सिंचनामुळे मजूर कमी लगातात. अशी माहिती बुधाजी पाटील यांनी दिली. येथील जमीन टॉमेटोसाठी पोषक असल्याने रोगाचे प्रमाणही कमी असते असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन आहारात टॉमेटो हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टॉमेटेला पसंती दिली जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टॉमेटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षापासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने हा माल दलालामार्फत विकला जातो. मुंबई, वाशी, वसई, ठाणे येथील व्यापारी हा माल घेण्यासाठी जागेवर जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने माल विकावा लागतो अशी माहिती युवा शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरूणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Web Title: A record crop of tomato on borer water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.