कचरा टाकणाऱ्यांकडून केला वसईत १३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:07 PM2018-12-11T23:07:41+5:302018-12-11T23:07:51+5:30

प्रत्येक प्रभागात ९ स्वच्छता दूत : एकूण ९० जणांची नियुक्ती

Recovery of fine of 13 lakh rupees was collected from garbage collectors | कचरा टाकणाऱ्यांकडून केला वसईत १३ लाखांचा दंड वसूल

कचरा टाकणाऱ्यांकडून केला वसईत १३ लाखांचा दंड वसूल

Next

वसई : या शहरात कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाºया नागिरकांविरोधात महापालिकेने स्वच्छतादूतांच्या माध्यमातून पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यास सुरु वात केली आहे. मध्यंतरी ही कारवाई बंद करण्यात आली होती. वसई-विरारमध्ये महिन्याभरात तेरा लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

शहरात कचरा टाकणाºया तसेच इतर अनेक मार्गाने शहर अस्वच्छ करणाºयांना वचक बसविण्यासाठी या शहरात महानगरपालिकेने स्वच्छतादूतांची (क्लिनअप मार्शल) नेमणूक केली आहे. यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर करून २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी चार कंपन्यांना ठेका दिला आहे. १० नोव्हेंबर २०१८ रोजी स्वच्छतादूतांचे काम सुरू झाले. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, धार्मिक स्थळे अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यांनी महिन्याभरात १३ लाखाचा दंड वसूल केला आहे. यामध्ये रस्त्यावर थुंकणे, कचरा करणे, वाहनातून कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे अशा गुन्ह्यÞांचा समावेश आहे. सध्या महानगरपालिकेतील ९ प्रभागात ही मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रभागात १० असे ९ प्रभागात मिळून ९० स्वच्छतादूतांची नेमणूक केलेली आहे. या चार कंपन्यांना वसूल केलेल्या दंडातील ३० टक्के रक्कम कमीशन म्हणून देण्यात येणार आहे. यातील ७० टक्के महापालिकेला मिळणार आहेत. या दंडाची छापील पावती संबंधीताला दिली जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये तारांकित मानांकनामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मात्र कारवाईला सुरुवात करण्याआधी ठेकेदाराला याबाबत जनजागृती करून जागोजागी फलक लावण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. परंतु कोणत्याही प्रकारचे जनजागृती विषयक कार्यक्रम न राबवताच दंड वसूल केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच काही स्वच्छतादूतांकडून दमदाटी करून दंड वसूल केला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. जे स्वच्छतादूत दमदाटी करून दंड वसूल करत आहेत. त्यांच्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ठेकेदार व नेमण्यात आलेले स्वच्छतादूतांची विशेष बैठकही घेण्यात येणार आहेत.

महापालिकेतर्फे जनजागृतीसाठी जाहिरात फलक शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा आणि अस्वच्छता नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ९ प्रभागात ही मोहिम सुरू आहे.
- वसंत मुकणे,
वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अधिकारी

Web Title: Recovery of fine of 13 lakh rupees was collected from garbage collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.