भरतीमध्ये ‘भारांकन’ नकोच!
By admin | Published: March 30, 2017 05:17 AM2017-03-30T05:17:57+5:302017-03-30T05:17:57+5:30
राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी
विक्र मगड : राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी . जर ती भारांकन पद्धतीनेच करावयाची असल्यास दहावीचे गुण गृहित न धरता कृषी पदविकेनुसार ती भरावी असे निवेदन कोकण विभाग पत्रकार संघ आणि युवा स्पर्श संस्था यांच्याकडून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कृषीसेवक भरतीमधे गैरप्रकार झाल्याने ती रद्द करून पुन्हा नव्याने भरांकन भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मात्र, ही भरती परीक्षेच्या माध्यमांतून न घेता १० वी आणि कृषी पदवी किंवा पदविकेचे गुण भरांकन पद्धतीने धरून केली जाणार आहे.
मात्र १० वीला गुण देण्याची पद्धत वारंवार बदलत गेली आहे. पहिल्यांदा सरळ गुण देण्याची पद्धत होती. त्यानंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होऊ लागली आणि सध्या बेस्ट आॅफ ५ चालू असल्याने अनेक परिक्षार्थींच्या गुणांमध्ये तफावत आहे.
या संदर्भातील आपल्या मागण्यांसह हर्षद पाटिल, सचिन भोईर, अमोल सांबरे व कृषी सेवक यांनी निवेदन सादर केले. हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता त्याबाबत वरीष्ठ कोणती भूमिका घेतात याकडे सर्व परिक्षार्थींचे लक्ष लागले आहे. या नव्या वादामुळे आधीच रखडलेली भरतीची प्रक्रिया आणखी काही महिने रखडणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेली बेरोजगारी आणखी लांबणार आहे.(वार्ताहर)
या आधीची भरती रद्द करु न भारांकन पद्धतीने यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी दहावीचे गुण गृहीत धरले जाणार आहे. २०१० पासून बेस्ट आॅफ फाईव्ह लागू असल्याने त्या आधीच्या विद्यार्थ्यांचे कृषी सेवक होण्याचे स्वप्न भंगणार आहे.
- मनीष पाटील,
कृषी पदविकाधारक
कृषी सेवक हा शेतीवर आधारीत योजनांचे कामकाज पाहत असतो. १० वी ला शेतीवर निगडित अभ्यासक्र म नसल्याने भारांकन पद्धतीने कृषी सेवक पदाची निवड करातांना केवळ कृषी पदविका, पदवी चे गुण गृहीत धरावे.
- राहुल पाटील
कृषी पदविकाधारक
काय आहेत मागण्या
कृषी सेवक पदांसाठी लागणारी पदविका आता तांत्रिक केल्याने ही या पदवीसाठी बारावीच्या परिक्षेच्या गुणांनुसार प्रवेश मिळत आहे. त्यामुळे या भरतीसाठी १० वी चे भरांकन गुण ग्राहय धरण्यात येऊ नयेत.
कृषी सेवक पदासमान असणाऱ्या ग्रामसेवक पदासाठी बारावीच्या ६० टक्के गुणांची पात्रता ग्राहय धरली जाते. या पद्धतीत दहावीचे गुण ग्राहय धरु नयेत व कृषी पदवीचे/पदवीकेचे गुण ग्राहय धरण्यात यावे.
जुने विदयार्थी दहावीला कमी गुण व कृषी पदविकेला जादा गुण मिळवणारे देखील आहेत. त्यामुळे दहावीचे गुण ग्राहय धरल्यास अशा उमेदवारांचे नुकसान होईल.