घोलवडची जलवाहिनी दुरु स्त

By Admin | Published: October 14, 2016 06:09 AM2016-10-14T06:09:02+5:302016-10-14T06:09:02+5:30

घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत रेल्वे स्थानाकाकडे जाणाऱ्या मार्गावर चावडी रस्त्यालगतची जाहिरात फलक लावताना फुटलेली भूमिगत जलवाहिनी

Rectilineal | घोलवडची जलवाहिनी दुरु स्त

घोलवडची जलवाहिनी दुरु स्त

googlenewsNext

अनिरुद्ध पाटील / डहाणू/बोर्डी
घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत रेल्वे स्थानाकाकडे जाणाऱ्या मार्गावर चावडी रस्त्यालगतची जाहिरात फलक लावताना फुटलेली भूमिगत जलवाहिनी लोकमतमध्ये वृत्त येताच तातडीने दुरूस्त झाली. तोपर्यंत तिच्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले होते. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात होते. या बाबत घोलवड ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला होता. ही जलवाहिनी खाजगी मालकीची असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले होत. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणीही जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले नव्हते. दरम्यान जाहिरात फलक लावताना ती फुटली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन चिखल साठल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.

Web Title: Rectilineal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.