भातशेतीला ‘रिलायन्सबाधा’

By admin | Published: June 3, 2017 06:12 AM2017-06-03T06:12:23+5:302017-06-03T06:12:23+5:30

भात पिकावर अवलंबून असणाऱ्या वाड्यातील शेतकऱ्यांना रिलायन्स गॅस पाईपलाईनमुळे यंदाच्या भातपीकाच्या हंगामास मुकावे लागणार

Reliance Relief for Paddy | भातशेतीला ‘रिलायन्सबाधा’

भातशेतीला ‘रिलायन्सबाधा’

Next

वसंत भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : भात पिकावर अवलंबून असणाऱ्या वाड्यातील शेतकऱ्यांना रिलायन्स गॅस पाईपलाईनमुळे यंदाच्या भातपीकाच्या हंगामास मुकावे लागणार आहे. खोदकाम करुन पाईपलाईन पुढे नेणाऱ्या या प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी व दलालांनी बांधबंदिस्तीची मोडतोड केल्याने व ती पूर्ववत न केल्याने शेती करायची कशी असा प्रश्न चिंचपाडा येथील शेतकऱ्यांनी विचारला असून कंपनीच्या या मुजोरी विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन तहसिलदारांना दिल्यामुळे महसूल प्रशासन काय कारवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातून रिलायन्स कंपनीची गॅस पाईपलाईन जात असून तिचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. हे काम करीत असताना जमिनीची प्रचंड नासधूस झाली असून पुन्हा ती पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळा सुरू व्हायला काही दिवसांचा कालावधी राहिला असताना बांधबंदिस्ती पूर्ववत कधी करणार असा प्रश्न चिंचघर पाडा येथील शेतकरी स्वप्नील पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे.
पाटील यांच्या मौजे चिंचघर येथील सर्व्हे नंबर २२२ मधील क्षेत्र ०.१९.४१ एवढे क्षेत्र रिलायन्स गॅस प्रकल्पात बाधीत झाले असून त्यामुळे ैआमचे नुकसान होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गॅस पाईप लाईन टाकतांना खोदकाम केलेल्या जमिनीमध्ये मातीचे ढीग तयार झाले आहेत. तर कुठे मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच शेतजमिनीची पातळी खाली वर झाली आहे.
रिलायन्स गॅस पाईपलाईनमध्ये जी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्याबाबत चिंचपाड्यातील शेतकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. .
पावसाळ्यापूर्वी जमीन पूर्ववत करा किंवा बांधबंधिस्ती करा. तसेच नुकसानीचे योग्य मुल्यमापन न केल्यास येत्या १५ जूनपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना देण्यात आल्या आहेत.

भरपाई नव्हे कर्ज
येत्या पावसाळ्यातील पेरणीला व भात पिकाला मुकावे लागणार असल्याने कंपनीने नुकसान भरपाई दिली आहे. ते कर्ज ठरण्याचा धोका शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे

जमिन पूर्ववत करण्याचे काम सुरू असून येत्या दोन दिवसांत बांधबंधिस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल .
- बाल सुब्रमण्यम,
सहाय्यक व्यवस्थापक,
रिलायन्स गॅस पाईपलाईन

Web Title: Reliance Relief for Paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.