मिठागर वस्तीची व्यथा सुरेश प्रभूंच्या दालनात, नवघरवासीयांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:25 AM2019-02-08T02:25:27+5:302019-02-08T02:25:39+5:30
वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते.
वसई - वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते. मात्र, ही सॉल्ट विभागाची जागा असल्याने या ठिकाणी रस्ते व इतर कामे करण्याच्या अडचणी निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.
या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचल्याने वसई विरार महानगरपालिकेच्या आपत्कालिन यंत्रणेला रेस्क्यू करु न कुटूंबाना अन्यत्र स्थलांतरीत करण्याची वेळ येत असते. तसेच मालमत्तेच नुकसान होते. गरोदर महिला, लहान मुले, अपंग , जेष्ठ नागरिक आदींना त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पूरजन्य परिस्थीती नंतरही संसाराची घडी बसविण्यासाठी वेळ लागतो. ही वस्ती सुविधांपासून वंचीत आहे. यासाठी महापौर रु पेश जाधव व व माजी महापौर नारायण मानकर यांनी अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेतली व त्यांना वसई नवघर पूर्वेकडिल मिठागर वस्ती विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली. तर पाणजू व भार्इंदर हा १३२५ कोटींचा ब्रिज होणार असला तरी सॉल्ट विभागाच्या जमिनी बाधीत होणार आहेत. याबाबत विभागाने विचार करावा असे निवेदन देण्यात आले.
केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन
वरील सॉल्टच्या जमिनीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सॉल्ट विभागाला दिल्ली येथे पाठविला आहे.
त्याचा अभ्यास करु न त्वरीत परवानगी द्यावी असे संबंधीत अधिकाºयांना आदेशीत केले व यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.