वसईच्या किल्ल्याची डागडुजी रखडली; अवैध बांधकामे आणि अविचारी कृत्यामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:38 AM2020-12-03T03:38:45+5:302020-12-03T03:39:04+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष, या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे.

Repair of Vasai fort stalled; Danger due to illegal constructions and reckless acts | वसईच्या किल्ल्याची डागडुजी रखडली; अवैध बांधकामे आणि अविचारी कृत्यामुळे धोका

वसईच्या किल्ल्याची डागडुजी रखडली; अवैध बांधकामे आणि अविचारी कृत्यामुळे धोका

Next

प्रतीक ठाकूर 

विरार : वसईतील पोर्तुगीजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी नरवीर चिमा­जी आप्पांनी वसईवर आक्रमण केले. वसईचा रणसंग्राम व मिळवलेला विजय हा हजारो मराठ्यांच्या रक्ताने लिहिला गेला आहे. त्यामुळे इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे. तीन दशकांचा हा इतिहास आहे. वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणून नरवीर रणवीर चिमाजीअप्पा यांच्या वसई किल्ल्याची ओळख आहे. परंतु या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली आहे.

या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. या किल्ल्यातील चर्च आणि जमिनीच्या आत दडलेले अवशेष शोधण्यासाठी रिवाइज कॉन्झरवेशन प्रोग्राम अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यक आहे. यासाठी वसई पुरातत्त्व विभागाकडून केंद्र सरकारकड़े अप्रूवल पाठवण्यात आले असून या निधीच्या प्रतीक्षेत पुरातत्त्व विभाग आहे. यातील एका चर्चच्या डागडुजीसाठी अंदाजे दोन कोटी निधी गृहीत धरला तरी यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता लागू शकते, असे पुरातत्त्व खात्याचा अंदाज आहे. 

ऐतिहासिक महत्त्व
१०९ एकरच्या परिसरांत पसरलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर एकूण ७ चर्च आहेत. 
यातील ५ चर्चच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येत आहे. 
देशभरातील १०० आदर्श स्मारकांमध्ये वसई किल्ल्याचा समावेश पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. 
या किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण ठेवा जपण्याचे काम रिवाइज कॉन्झर्वेशन प्रोग्रामअंतर्गत करण्यात येत आहे.

पुरातत्त्व विभागाने कंबर कसली 

येथे होणाऱ्या बेकायदा बांधकामांनी किल्ल्याला  धोका  निर्माण होत आहे. दोनेक वर्षांपूर्वी किल्ल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी दुर्गप्रेमीच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कंबर कसली होती. त्यानुसार अनिधकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. 

वसई किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात. एका बाजूला असलेली वसई-नायगावची खाडी तर दुसऱ्या बाजूला कोळी बांधवांची गावे आहेत. 

नरवीर चिमाजी अप्पांचा किल्ला हा वसईचा इतिहास आहे  त्याच्या नूतनीकरणासाठी अनेक वेळा आम्ही मागणी केली आहे, पण ठोस काही झाले नाही. यामुळे किल्ल्याची अजून दुर्दशा होत आहे. - महेश राऊत, गडप्रेमी 

 

Web Title: Repair of Vasai fort stalled; Danger due to illegal constructions and reckless acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड