पुन्हा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 04:43 PM2019-02-13T16:43:55+5:302019-02-13T16:46:07+5:30

पालघर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात वरचेवर भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Repeated earthquake strikes in Palghar district | पुन्हा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के 

पुन्हा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के 

Next
ठळक मुद्देआज सकाळी १०.४४ वाजताच्या दरम्यान पालघर येथे धुंदलवाडी, तलासरी परिसरात 3.1  रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवलाया घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

पालघरपालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचीमालिका सुरू आहे. आज सकाळी १०.४४ वाजताच्या दरम्यान पालघर येथे धुंदलवाडी, तलासरी परिसरात 3.1  रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.पालघर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात वरचेवर भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे बसले होते. तसेच एका २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा याचे भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे  

Web Title: Repeated earthquake strikes in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.