समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:04 AM2020-08-17T02:04:12+5:302020-08-17T02:04:16+5:30
या तिघांनीही आपला जीव वाचवणा-या देवदूताशीच काही वेळ हुज्जत घातली.
वसई : विरारच्या राजोडी किनाºयावर समुद्रात बुडणाºया तिघांना जीवरक्षकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवल्याची घटना शनिवारी घडली. मद्यपान करून समुद्रात उतरलेल्या तिघांची यावेळी भलतीच अरेरावी पाहायला मिळाली. या तिघांनीही आपला जीव वाचवणा-या देवदूताशीच काही वेळ हुज्जत घातली.
राहुल पाटील, प्रदीप झा, शुभम झा अशी या पोहायला गेलेल्या तरुणांची नावे असून जीवरक्षकाने प्रसंगावधान राखल्याने तिघांचाही जीव वाचला आहे. १५ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास विरारमधील राजोडी किनारी समुद्रात हे तिघे तरुण मौजमजा करायला गेले होते. हे तिघेही राजोडी वॉच टॉवर येथून दक्षिण दिशेला साधारणपणे ५०० मीटर अंतरावर होते. त्याचवेळी जीवरक्षक चारुदत्त मेहेर धावत खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात गेले आणि प्रसंगावधान दाखवत मेहेर यांनी तिघाही तरुणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र समुद्रातून बाहेर काढल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांनी जीवरक्षकाशीच हुज्जत घातली. आपले प्राण वाचवल्याबद्दल आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करणे राहिले दूरच, उलट त्यांनी या देवदूताशीच अरेरावी केली. त्यामुळे उपस्थितांना संताप अनावर झाला होता.
>जीवरक्षक प्रसंगावधान दाखवून वेळेवर पोहोचले नसते, तर यातील एखादा तरुण जीवास मुकला असता. त्यांचा जीव वाचवणाºया देवदूताशीच अरेरावी करणाºया एका तरुणाला स्थानिक नागरिकांनी चोप दिला.