दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:31 PM2019-08-01T23:31:40+5:302019-08-01T23:31:58+5:30

पालघर जिल्हाधिकारी : पत्रकारांशी साधला संवाद

Resolving citizen complaints every Monday | दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

googlenewsNext

पालघर : जिल्ह्यातील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग भेटत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आता प्रत्येक सोमवारी मुख्य अधिकाºयाने जिल्हा मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील काही समस्या आणि महत्त्वपूर्ण बाबी पत्रकारांकडून समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनोर - विक्रमगड रस्त्याची झालेली दुरवस्था, कुपोषण तसेच रोजगाराची समस्या, त्यातून होणाºया आत्महत्या, रेशन बायोमेट्रिकचा प्रश्न असे अनेक प्रश्न समोर आले.
पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य पोषण आहार, कुपोषण निर्मूलन यासोबतच शेती आणि शेतीशी निगडित रोजगार निर्मितीवर माझा प्राधान्यक्र म असेल असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भात कापणी झाल्यावर रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर आणि मग कुपोषण ही प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली बाब रोखण्यासाठी २५ हजार शेतकºयांसाठी फळझाडे लागवड, हरभरा, चवळी आदी उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे सांगितले. तसेच मनरेगा व इतर योजनांच्या साहय्याने रोजगार निर्मितीवर आपण भर देणार असून जिल्हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढीसाठी सातारा येथे राबविलेला गुणवत्ता सुधार कार्यक्रम इथे राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व आरोग्य तपासणी नियमितपणे होण्यावर आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

घेतली समस्यांची माहिती
च्जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३०६ उपकेंद्रे एवढी मोठी सशक्त आरोग्य यंत्रणा असताना इथल्या रुग्णांचा विश्वास मात्र वापी आणि सिल्वासा येथील सरकारी रुग्णालयावर जास्त असतो.
च्जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे असलेले आव्हान, तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषण, पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, शहरातील वाहतूक कोंडी, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आदी जिल्ह्यात भेडसावणाºया अनेक समस्यांची माहिती जिल्हाधिकाºयांनी करून घेतली.

Web Title: Resolving citizen complaints every Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.