पालिकेच्या जागेवर रिसॉर्ट
By admin | Published: March 31, 2017 05:23 AM2017-03-31T05:23:01+5:302017-03-31T05:23:01+5:30
महापालिकेच्या मालकीच्या राजोडी येथील जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी रिसॉर्ट बांधण्यात येत असून त्यासाठी
वसई: महापालिकेच्या मालकीच्या राजोडी येथील जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी रिसॉर्ट बांधण्यात येत असून त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याची तक्रार जनआंदोलन समितीने केली आहे.
राजोडी येथील सर्व्हे क्रमांक २४६, हिस्सा क्र. २ ही जागा तत्कालीन ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. महापालिकेच्या निर्मिती नंतर ही जागा महापालिकेच्या मालकीची झाली आहे. या जागेवर सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने या जागेकडे दुर्लक्ष केल्याने आता या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार जनआंदोलन समितीचे डेरीक डाबरे यांनी आयुक्तांना केली आहे.
तक्रारीनंतर उपायुक्त अजीज शेख यांनी या प्रकरणी कारवाईचे करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त राजेंद्र पाटील यांना दिले होते. मात्र, पाटील यांनी जागेवर जाऊन थातूरमातूर कारवाई करून दिशाभूल केली अशी त्यांची तक्रार आहे.
दरम्यान, त्यांनी प्रभाग समिती अ चे सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी पाहणी केली असता प्रकरण सत्य असल्याचे आढळून आले आहे. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असून त्यानंतरही अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले नाही तर महापालिका त्यावर कारवाई करील. ही जागा महापालिकेची आहे की सरकारची याबाबत खातरजमा करून ती ताब्यात घेण्यासंंबंधी कार्यवाही सुुरु केली जाईल, अशी माहिती संख्ये यांनी दिली. आता कारवाईकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)