सायवन महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद; साडे पाचशे रु ग्णांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:27 AM2019-02-12T05:27:59+5:302019-02-12T05:28:13+5:30
डहाणू तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून या शिबिराचा परिसरातून साडे पाचशे रु ग्णांनी लाभ घेतला
कासा : डहाणू तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून या शिबिराचा परिसरातून साडे पाचशे रु ग्णांनी लाभ घेतला
तालुक्यातील सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट विवळवेढे मार्फत रविवारी मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आले त्याचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केले. यावेळी सायवन सरपंच सुनंदा महाले ट्रस्टचे कोषाध्यक्ष वसंत सातवी, कार्यवाह शशिकांत ठाकूर ,सदस्य रमेश मलावकर, अनंता खुलात आदि उपस्थित होते .आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य समस्या लक्षात घेऊन मंदिर ट्रस्ट कडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायवन भागातील दिवशी, दाभाडी, चळणी, सुकटआंबा, किन्हवली, बापूगाव, निंबापूर, आष्टा, रायपूर, उधवा, गांगोडी, धरमपूर, वाघाडी आदी गावातील रु ग्ण सहभागी झाले होते. तज्ज्ञ डॉक्टराकडून हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेही, लहान मुलांचे आजार, स्त्रीयांचे आजार, तसेच कान, नाक, घसा संबंधित आजारांची मोफत तपासणी व उपचार केले. विशेष बाब म्हणजे रुग्णांना उपचारासाठी शिबिराकडे त्यांच्या गावापासून ने आणण्यासाठी ट्रस्टने गाड्यांची व्यवस्था केली होती . तर गर्भाशयाच्या गाठी, हर्निया, हायड्रॉसील, लहान मुलांच्या लघवीच्या अरु ंद जागा, मूळव्याध असे आजार असणाऱ्या गरीब गरजू रु ग्णाची तज्ञ डॉक्टराकडून उपचार करून मोफत शस्त्रक्रि या पुढील आठवड्यात करण्याचे ठरले
या शिबिरात डॉ प्रकाश राऊत,डॉ शरद सातवी, डॉ रणधीर कदम डॉ प्रदीप धोडी डॉ निलेश अस्वार, डॉ शरद पाटील, डॉ उमेश भुसारा,डॉ अभिजित चव्हाण, डॉ प्रसाद तरसे, डॉ हेमंत भोये , डॉ परेश जव्हारकर, डॉ प्रवीण राठोड, डॉ मुकणे सहभागी झाले होते.