तारापूर येथील सेफ्टी एक्स्पोला प्रतिसाद
By admin | Published: March 5, 2017 02:27 AM2017-03-05T02:27:52+5:302017-03-05T02:27:52+5:30
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून इंडस्ट्रियल इन्फोटेक च्या वतीने तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन व एमआयडीसी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तारापूर
बोईसर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून इंडस्ट्रियल इन्फोटेक च्या वतीने तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन व एमआयडीसी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तारापूर एमआयडीसीमध्ये आयोजित केलेल्या सेफ्टी, सेक्युरिटी आणि एनव्हायरो कंट्रोल एक्स्पो २०१७ चे शनिवारी उद्घाटन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालयचे जॉईट डायरेक्टर एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यांत आले. या एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या एक्स्पोचे मुख्य आकर्षण म्हणजे कामगार व औद्योगिक सुरिक्षतते बरोबरच कार्यालय व वैयिक्तक सुरिक्षतते बाबत अद्यावत यंत्रसामुग्री असून ध्वनी, हवा व पाणी प्रदूषण नियंत्रण करणारी उपकरणे नवीन तांत्रिक व बिगर तांत्रिक सुरक्षा यंत्रणा हे असून विविध प्रकारचे सटॉल्स असून त्या मध्ये डेमो उभारून सर्व माहिती व प्रात्यक्षिक करून दाखिवण्यांत येत आहे. तर उदघाटन प्रसंगी टिमा चे अध्यक्ष डी. के. राऊत इंडस्ट्रियल इन्फोटेकचे डायरेक्टर नियम आलम टिमा मार्ग चे चेअरमन वेलजी गोगरी, लुपीन चे वाईस प्रेसिडेंट विजय कोठीवाले, जे एस डब्लू स्टील चे अधिकारी बबन जाधव, इंडिया गॉट टॅलेंट शॉ फायनालिस्ट सिफू राम कारकी व फिल्म डायरेक्टर प्रसाद राव आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)