क्रीडांगण खटल्याचा निकाल ग्रामस्थांच्या विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:58 AM2017-07-18T01:58:38+5:302017-07-18T01:58:38+5:30

सातपाटी ग्रामपंचायत पुरस्कृत ‘श्रॉफ मैदाना’ च्या जमिनीवर हक्काबाबत सातपाटी ग्रामस्थांनी दाखल केलेला दावा सबळ पुरावे सादर न केल्याचे

The result of the playground case against the villagers | क्रीडांगण खटल्याचा निकाल ग्रामस्थांच्या विरोधात

क्रीडांगण खटल्याचा निकाल ग्रामस्थांच्या विरोधात

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : सातपाटी ग्रामपंचायत पुरस्कृत ‘श्रॉफ मैदाना’ च्या जमिनीवर हक्काबाबत सातपाटी ग्रामस्थांनी दाखल केलेला दावा सबळ पुरावे सादर न केल्याचे कारण देऊन येथील न्यायालयाने अमान्य केला. या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
सातपाटी च्या गट नंबर ४२४ पैकी १५.५१ हेक्टर जागा श्रॉफ कुटुंबियांच्या मालकीची होती. हे कुटुंबिय अनेक वर्षा पासून सातपाटीत रहात होते.मात्र ते परदेशात रहायला गेल्याने त्यांनी आपली सर्व जमीन उस्मान छाप्रा आणि साजिद शेख यांना विकली होती. मात्र ह्या जमिनी पैकी सातपाटी मच्छिमार सहकारी संस्थेच्या बर्फ कारखान्या समोरील रस्त्या लगतची सुमारे सव्वातीन एकर जमीन हि श्रॉफ कुटुंबीयांनी ग्रामस्थांना क्र ीडांगणा साठी दानपत्रा द्वारे दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. मात्र श्रॉफ कुटुंबीयांनी ग्रामस्थांना दिलेली जागा हि बर्फ कारखान्या समोरील नसून ती सातपाटी सागरी पोलीस स्टेशन समोरील असल्याचे शेख ह्यांचे म्हणणे होते. हि जागा तत्कालीन सरपंच विद्या माळी यांच्या नावावर करून केलेले दानपत्र त्यावेळचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दडवून ठेवल्याचा आरोप करून सातपाटी क्रीडा असोसिएशनच्यावतीने २०११ साली पालघरच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या सर्व जमिनीचे कागदोपत्री मालक असलेले साजिद शेख यांनी मात्र श्रॉफ कुटुंबीयांनी ग्रामस्थांना दिलेली जागा ही सातपाटी सागरी पोलीस स्टेशन च्या समोरील असल्याचे सांगितले होते. व तसे पुरावे ही न्यायालया पुढे सादर केले होते. तद्नंतर काही ग्रामस्थाच्या हाती आपल्याला श्रॉफ कुटुंबियांनी बर्फ कारखान्या समोरीलच जमीन दानपत्राद्वारे दिल्याचे कळल्या नंतर आणि त्या जागेची विक्री होऊन आपल्या क्र ीडांगणाच्या जमिनीवर खुंटे गाडले गेल्यानंतर ते ग्रामस्थांनी उखडून फेकून दिले होते. १७ ग्रामस्थाच्या विरोधात त्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ जुलै रोजी सत्र न्यायाधीश डी यू डोंगरे यांनी साजिद शेख व उस्मान छाप्रा यांनी ही जमीन शासकीय न्यायप्रक्रिये नुसार विकत घेतली असून बर्फ कारखान्या समोरील जमीन हि दोन्ही विकासकांची असल्याचा निवाडा दिला.याचिका कर्त्यांच्या बाजूने अ‍ॅड.मोहन जोशी आणि आनंद माळी तर समोरच्या बाजूने अ‍ॅड.संदीप शाह आणि सुधीर गुप्ता ह्यांनी काम पाहिले.

न्याय देवतेवर माझा विश्वास असल्याचे मी ह्या पूर्वीच सांगितले होते.माझ्याकडे असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला.
- साजिद शेख, जमीन मालक

तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक ह्यांच्या संगनमताने खोटे दस्तावेज बनविण्यात आले असून आम्ही ह्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत.
- सुभाष तामोरे, माजी सरपंच

Web Title: The result of the playground case against the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.