रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:32 AM2018-06-27T01:32:10+5:302018-06-27T01:32:16+5:30

वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले

Revenue administration next to the cantonment of Ratimapiya | रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल

रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल

Next

अजय महाडीक
मुंबई : वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले असले तरी प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल, पोलीस, मेरिटाईम आणि रेल्वे प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात आहे. प्रत्यक्ष कारवाई सुरु असतांना माफियांंकडून होणारा धारदार कातळाच्या दगड गोट्यांचा मारा त्यांच्या उरात धडकी भरवत आहे. आतापर्यंत अनेक जण या कारवाईमध्ये जखमी झाल्याचे नारिंगी येथील ग्रामस्थ तसेच नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी स्पष्ट केले आहे.
ज्युली खारभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी बेटावरील भात शेतीच्या व कांदळवनाच्या रक्षणासाठी वर्ष २०१४ पासून प्रखर भूमिका घेऊन न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. आज त्यांच्या पाठीशी गावातील १५२ कुटुंबे ठामपणे उभे आहेत. चार महिन्यांपूर्वी टेंबीखोडावे येथे महसूल विभागाच्या कारवाईच्या वेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पंधरा तलाठी यांच्या पथकाने कारवाई केली होती. यावेळी झालेल्या दगड गोट्यांच्या माऱ्यात हरेश म्हात्रे, किशोर पाटील, विजय पाटील व तलाठी बांगर जखमी झाले होते. या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात ४५ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैतरणा, कसराळी, शिरगाव, खार्डी, डोलीव व टेंबी गोडावे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सक्शन पंपाद्वारे रेतीचे उत्खनन होते. एका सक्शन पंपाद्वारे दहा मिनिटात एक बोट रेती (सहा ब्रास) चे उत्खनन होते. असे शंभर ते दीडशे सक्शनपंप लावून रेती काढली जाते. विशेष म्हणजे नारिंगे वगळता कोणत्याही रेती बंदरातील बोटींना रेती उत्खननासाठी बंदर विभागाची परवानगी नाही. दरम्यान, पोलीस सरक्षण असतांना सुद्धा हे हल्ले होत असल्याने खारभूमीच्या रक्षणासाठी उभे ठाकलेले गावकरी भयभीत झाले आहेत.

उत्खननाला विरोध करणाºया गावकºयांना माफियांकडून धमक्या
गावकºयांना माफियांकडून धमक्या दिल्या जात आहेत. रात्री अपरात्री दगडांचा मारा होतो. तरीही या माफियांच्या विरोधात नांिरंगीचे गावकरी कंबर कसून उभे आहेत. पोलीस तक्रार घेत नाहीत, उलट सुलट प्रश्न विचारुन कायद्याचे ज्ञान नसणाºया गावकºयांच्या अंगावर ओरडतात. महसूल विभागाकडून दोन चार महिन्याने थातूर-मातूर कारवाई केली जाते आणि पुन्हा सक्शन पंप सुरु होतात. तक्रारींच्या रेट्यामुळे ७ जून २०१८ रोजी नायब तहसीलदार दिपक गायकवाड, सर्कल आॅफिसर सोनावणे, नारिंगे तलाठी अक्षदा गायकर, मेरिटाईम विभागाचे बंदर निरिक्षक सुशिल पाटणकर व खार भूमी विभागाच्या गीता गायकवाड यांनी पहाणी केली असून त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांना सुपुर्द केला असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

२०१२ मध्ये वैतरणा रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला असल्याचे लक्षात आल्यावर २० ते २२ दिवस रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या पुला खाली उत्खनन सुरु असल्याची तक्रार जुली खारभूमी लाभार्थी सहकारी संस्था, नारिंगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी शिरगाव, कसराळी, वैतरणा पूर्व व पश्चिम, खार्डी, तानसा, व टेबी खोडावे या लॅडिंग पॉर्इंटवर वारंवार कारवाई करुन रेती माफियांचे कंबरडे मोडले होते.

Web Title: Revenue administration next to the cantonment of Ratimapiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.