वसईत बेकायदा उभारलेले कोळंबी प्रकल्प उध्वस्त करण्यास महसूल व पालिका प्रशासनाकडून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:48 PM2021-02-10T12:48:59+5:302021-02-10T12:50:33+5:30
Vasai-Virar News : भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृत पणे उभे असलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त याच्या आदेशाने बुधवारी निष्कासित करण्यास सुरुवात
वसई - भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृत पणे उभे असलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त याच्या आदेशाने बुधवारी निष्कसित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी लोकमत ला दिली आहे,
दरम्यान राज्य शासनाने सदर कोलंबी प्रकल्प तोडण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती त्याचा अहवाल सादर होताच कोकण आयुक्त यांचे आदेशानुसार याठिकाणी तोडू कारवाईचे आदेश यापूर्वीच वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले होते
त्यानुसार बुधवारी सकाळीं च या कारवाईस सुरुवात झाली यामध्ये वसई महसूल विभाग चे प्रांत ,तहसीलदार आणि वसईच विरार महापालिका प्रशासन यांचे उपायुक्त व नगररचना विभाग तसेच पोलीस विभाग यांनी संयुक्त विद्यमाने बुधवारी जोरदार तयारी केली
परिणामी या एकुणच मोठया कारवाई साठी 200 पेक्षा जास्त पोलीस ताफा, 30 बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशामक दल आदी मोठा फौजफाटा भुईगाव पश्चिम भागात कारवाई ठिकाणी सज्ज झाला आणि काही वेळापूर्वी च या प्रशस्त कारवाई ला सुरुवात झाली आहे.
या तोडू कारवाईसाठी पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा, मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती कार्यकर्ते यांनी ही कारवाई शासनाच्या वतीने होण्यासाठी तथा येथील पाणथळ जागावरील अतिक्रमण मोकळे करून त्यावर कांदळवन निर्माण करीत याठिकाणी पर्यावरण रक्षण होणेकामी आतापर्यंत भुईगाव व पश्चिम पट्टीतील गावकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.