महसूल विभागाचा ‘१८ वा महिना’, भरपाई तुटपुंजी त्यातही सरकारने केली क्रूर थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:06 AM2018-08-07T03:06:28+5:302018-08-07T03:06:31+5:30

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरनपाईचे महसूल खात्याने दिलेले चेक त्यावर १८ व्या महिन्याचा उल्लेख असल्याने न वटता परत आले आहेत.

Revenue department's '18th month ', the compensation dropped by the government, the brutal joke | महसूल विभागाचा ‘१८ वा महिना’, भरपाई तुटपुंजी त्यातही सरकारने केली क्रूर थट्टा

महसूल विभागाचा ‘१८ वा महिना’, भरपाई तुटपुंजी त्यातही सरकारने केली क्रूर थट्टा

googlenewsNext

नालासोपारा: जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरनपाईचे महसूल खात्याने दिलेले चेक त्यावर १८ व्या महिन्याचा उल्लेख असल्याने न वटता परत आले आहेत. त्यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी तारीख टाकून महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे पाच हजार रूपयांचे धनादेश धन न देता को-या कागदाच्या रूपात बॅकेकडून परत आले आहेत.
जुलै महिन्यातील नऊ ते बारा दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण वसई तालुका जलमय झाला होता. आठवडाभर सखल भागात पाणी साचलं होते.अनेकांच्या घरात गुढघाभर पाणी साचून टीव्ही, फर्नीचरसह अन्नधान्याचेही मोठे नुकसान झाले होते. शासनाच्यावतीने महसूल विभागाने या पूरपिडीतांच्या घराचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल या आशेवर पूरग्रस्त होते. प्रत्यक्षात नुकसान लाखांच्या घरात पण गेल्या आठवड्यात आलेले चेक फक्त पाच हजाराचे होते. त्यामुळे नागरिकांनी मदत देताय कि भीक? अशा शब्दात जाहिर नाराजी व्यक्त केली होती. त्यात चेकवरील आकडाही अजब गजब टाकण्यात आला होता. बुडत्याला काडीचा आधार मानून पूरग्रस्तांनी चेक बॅकेच्या खात्यात टाकले. त्यापैकी अनेकांचे चेक न वटताच परत आले. शासनाकडून मदत म्हणून देण्यात आलेल्या चेकवर असंख्य चुका असल्यामुळे ते वटले नसल्याचे समोर आले आहे. काहींची नावे चुकीची टाकण्यात आली आहेत. तर काहींच्या चेकवर चक्क २०.१८.२०१८ हि कधीही न उगवणारी तारीख टाकण्यात आली आहे. महसूल खाते हे चुकीचे चेक जमा करीत असून नवीन देणार आहे.
>चुका सुधारून महसूल खाते नवे चेक देणार
पूरग्रस्तांचा तातडीने मदत कशी मिळेल यासाठी महसूल प्रशासनाने धावपळ केली .मात्र घाईगडबडीत काही चुका झाल्या असतील त्या दुरूस्त करून पुन्हा ते नागरिकांना देण्यात येतील असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Revenue department's '18th month ', the compensation dropped by the government, the brutal joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.