...अन् विरार रेल्वे स्थानकात चक्क रिक्षा फलाटावर धावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 11:20 PM2019-08-05T23:20:21+5:302019-08-06T06:58:38+5:30
पोलीस अधिकाऱ्याचा निर्णय
वसई : मुसळधार पावसात अडकलेल्या एका गर्भवतीला विरार रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाºयाने चक्क विरार रेल्वे स्थानकात उभ्या ट्रेनच्या महिला डब्यापर्यंत ती रिक्षा नेली.
वसई - विरारमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच रविवारी सकाळी ९ वाजता विरारमधील एका गर्भवतीला त्रास होऊ लागल्याने तिला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करायचे होते.
दरम्यान, तेथे उपस्थित मुंबई पोलीस दलात कार्यरत एका पोलीस अधिकाºयाने या महिलेला रिक्षातून थेट विरार स्थानकाच्या फलाट क्र.२ वर उभ्या असलेल्या लोकलच्या महिला डब्यापर्यंत नेले. मात्र वसई - नालासोपारा दरम्यान रेल्वे रु ळावर प्रचंड पाणी साचल्याने रेल्वे सेवा पूर्ण ठप्प होती. परिणामी, रेल्वेचा पुढील हा प्रवास अशक्य आणि जिकिरीचा होता.
अखेर प्रसंगावधान राखीत या महिलेला रिक्षातूनच विरार नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकरणात त्या पोलीस अधिकाºयाने रिक्षा थेट फलाटावर आणल्याने त्याला रेल्वे पोलिसांनी कार्यवाही म्हणून ताब्यात घेतले. पोलीस दलातील या अधिकाºयाने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी कायदा हा सर्वांना समान आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि त्यांच्या नियमानुसार या पोलीस अधिकाºयासह सर्व दोषींवर कारवाई होणार असल्याची चर्चा
आहे.