वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:44 AM2018-08-04T00:44:29+5:302018-08-04T00:44:37+5:30
फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे.
वसई : फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. यामुळे गत काळात नागरिकांचे होणारे हाल पुढील काळात होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी खडी व ग्रिट पावडरच्या मिश्रणाचा वापर होत होता. मात्र हा फार्मुला पावसाच्या रिपरिपी पुढे टिकत नव्हता. काही दिवसातच ही मलमपट्टी उघडी पडत असल्याने महानगरपालिका प्रशासनाला होणाऱ्या टिके पूढे निरुत्तर व्हावे लागत होते. तसेच या मलमपट्टीवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नालासोपारा येथील संतोष भुवन, विरार इस्ट येथील चंदन सार, विरार पूर्व व पश्चिमेला जोडणारा फाटक रोड , तुळींज आदी भागात रस्त्यांची दुरावस्था असून संपूर्ण शहराचा विचार करता २५० खड्ड्यांची नोंद असून त्यातील ४० खड्डे गंभीर आहेत. दरम्यान, विरार महापालिकेने यंदा प्रथमच आर.एम.सी च्या तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. त्यातील तयार सिमेंट हे घट्ट असून ते लगेच खड्ड्याला घट्ट पकडून राहते. त्यामुळे पाऊस किती ही झाला तरी त्या बुजवलेल्या खड्डयावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही.
आर.एम.सी तंत्रज्ञान
नक्कीच उजवं ठरेल !
डांबरीकरण करण्यासाठी किमान सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो. त्यासाठी पावसाची उघडीप लागते. परंतु मोठा पाऊस आला की, ते काम वाया जाऊन वेळ आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे भविष्यात हे नवं आर एम सी तंत्रज्ञान नक्कीच उजवं ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.