पालघर जिल्ह्यात आॅफ रोड ड्रायव्हींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:22 AM2018-07-25T02:22:19+5:302018-07-25T02:22:40+5:30

साहसी चालकांसाठी संधी; संपूर्ण भारतातून येतात डेअर डेव्हील

Off Road Driving in Palghar District | पालघर जिल्ह्यात आॅफ रोड ड्रायव्हींग

पालघर जिल्ह्यात आॅफ रोड ड्रायव्हींग

googlenewsNext

- निखिल मेस्त्री

नंडोरे : दगड मातींचे ढिगारे, उंच सखल भागात तयार केलेले ट्रॅक्स, पाणथळ जमिनीवरून आपली कार चालविण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तो शेलवली या गावातील स्पेशल ट्रॅकवर उपलब्ध झाला आहे.
पालघर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेलवाली गावात आशिष पाटीलच्या या भन्नाट कल्पनेने महाराष्ट्रातील एकमेव आॅफ रोड रेसिंग ट्रॅक साकारला आहे. त्याने बनविलेल्या इको वुड्स या कृषी पर्यटनाच्या जागेत हि आगळी वेगळी कल्पना साकारली आहे. वाहन चालविण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठीही आॅफ रोड ड्रायव्हींगचा थरार उपलब्ध आहे. उंच सखल भागातून नागमोडी वळणे घेत चिखल मातीतून आपले वाहन नेण्याचे कौशल्य चालकांना येथे अनुभवायास मिळणार असून तो एक थरार असतो. आपल्या वाहनाचे कौशल्य अनुभवण्यासाठी लोक डोंगर दऱ्यात जातात व त्यात जोखीमही तितकीच असते. मात्र येथे त्यांना आपले वाहन कौशल्य विना जोखीम आजमावता येते. सहा एकर परिसरात जंगल, दºया -खोºयांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. अलीकडेच या खेळाला मढ क्रशर्स असे नावही मिळाले असून गुजरातहून मुंबईपर्यंतच्या अनेकांनी येथे वाहन चालविण्याचा हा थरार अनुभवला आहे.
या खेळ मर्यादित ठेवायचा नसून तो राष्ट्रीय पातळीपर्यंत न्यायचा आहे याला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता हा खेळ आता आहे. त्यापेक्षाही हायटेक करण्यात येणार आहे.

Web Title: Off Road Driving in Palghar District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.