बेवारस वाहनांमुळे रस्त्यांची घुसमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:52 PM2019-06-12T22:52:15+5:302019-06-12T22:52:47+5:30
वसईकरांची डोकेदुखी : महानगरपालिका प्रशासन व पोलीस खात्याची आळीमिळी गुपचिळी
मंगेश कराळे
नालासोपारा : वसई विरार शहरातील गर्दी असलेल्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे वसईतील रस्त्यांची घुसमट झाली असून वसईकरांना चालणेही त्रासदायक बनले आहे. या भंगार गाड्यांमूळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
रात्रीच्या वेळी गर्दुल्ले या भंगार गाड्यांमध्ये बसून चरस गांजा पिताना दिसतात. महानगरपालिकाकडे जागा नाही, वाहतूक पोलीस या गाड्या उचलत नाही. त्यामुळे नागरिकांनी कुणाकडे कैफियत मांडायची असा प्रश्न पडला आहे. या दुर्लक्षित वाहनामधील अनेक महत्वाचे पार्ट चोरीला गेल्याचे दिसत असल्याने त्यांची कस्टडी असणाऱ्या खात्यावर टिका होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्चन्यायालयाने रस्त्याच्या कडेला असणाºया या भंगार गाड्यांना हटविण्यासाठी व नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी हा प्रश्न उभा टाकला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वसई तालुक्यातील अनेक रस्त्याच्या कडेला ही वाहने बिनधास्तपणे पडलेली असूनही वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकायांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. शहरातील ही वाहने गुन्हेगारीचा अड्डा बनली असून पोलीस यंत्रणेकडूनही या वाहनांचा हिशेब ठेवला जात नाही.
या प्रकरणी अनेक विद्यार्थी व वाटसरुंनु आपली कैफियत मांडली असून महानगरपालिका व पोलीस प्रशासन कधी कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
गाड्या सडल्याने पसरत आहे घाण...
वसई, विरार, नालासोपारा या शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक मिहन्यापासून भंगार गाड्या असल्याने सर्वत्र घाण पसरत आहे. नागरिक या भंगार गाड्यावर कचयाच्या पिशव्या फेकत आहे. साफसफाई कर्मचारी हा कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्घधीं पसरली असल्याने मच्छरांची पैदास सुद्धा वाढली आहे
भंगार गाड्या बनल्या गदुर्ल्यांचा अड्डा...
शहरातील अनेक रस्त्यांच्या किनायालगत मोठ्या भंगार वाहनात गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी याच गाड्यांमध्ये बसून गर्दुल्ले नशा करतात. कारण याबाबत कोणीही सामान्य नागरिक तक्र ार करत नाही. हेच गर्दुल्ले रात्रीच्या वेळी येणाया जाणाºया लोकांना निशाणा बनवून लुटतात. जर विरोध केला तर हे गर्दुल्ले नशेच्या धुंदीत जीवघेणा हल्ला करण्यास मागेपुढेही पाहत नाही. वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यात गर्दुल्यांकडून चोºया आणि मारामारीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत.
महानगरपालिकेने भंगार गाड्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर अनेक रस्त्यांच्या किनाºयालगत अनेक महिन्यापासून पडून असलेल्या बेवारस आणि भंगार गाड्या एकाच ठिकाणी जमा करून ठेवता येतील.
- संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
भंगार गाड्या उचलून एका ठिकाणी जमा करण्यासाठी लवकर वाहतूक पोलिसांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
- बळीराम पवार,
आयुक्त, वसई विरार
महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती बघता असे वाटत नाही की, आम्ही महानगरपालिका क्षेत्रात राहतो की ग्रामपंचायतीमध्ये.
- राजीव सिंग (स्थानिक नागरिक)