रस्ते, रेल्वे अन् सागरात सुरक्षा कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:59 AM2019-03-08T00:59:40+5:302019-03-08T00:59:46+5:30
पुलवामा दहशतवादी हल्यानंतर हायलर्ट जारी झाला असून रस्ते, रेल्वे आणि समुद्रीमार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षात्मकदृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
बोर्डी : पुलवामा दहशतवादी हल्यानंतर हायलर्ट जारी झाला असून रस्ते, रेल्वे आणि समुद्रीमार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षात्मकदृष्टीने हालचालींना वेग आला आहे. समुद्रात तटरक्षक दलाने हावर्डक्राफ्टद्वारे तर रेल्वे सुरक्षा दलातर्फे उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेसच्या बोगींची तपासणी केली जात आहे. सीमा भागातील रस्त्यांवरही पोलीस वाहनांची चौकशी करीत आहेत.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात कसाब आणि त्यांच्या साथीदारांनी अरबी समुद्रातून घुसखोरी करून गुजरात आणि पालघर जिल्ह्याच्या समुद्री मार्गाचा वापर केला होता. पाकिस्तान आणि गुजरातच्या समुद्र सीमेलगत हरामीनाला हा भाग घुसखोरीकरिता रेडअलर्ट समजला जातो. कच्छनंतर झाई बंदरापासून पालघर जिल्ह्याचा किनारा आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हायअलर्ट जारी केला असून त्या अनुषंगाने भारतीय तटरक्षक दलातर्फे सातत्याने समुद्रात हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याकरिता मुंबईहून हावर्डक्र ाफ्टला पाचारण केले आहे.
या दलाच्या चिखले गावातील प्रकल्पालगतच्या रिठी किनाऱ्यावर ही क्र ाफ्ट आली आहे. त्यानंतर नेमाने पेट्रोलिंगचे काम केले जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी ही अत्याधुनिक क्र ाफ्ट जिल्ह्यात असणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता डहाणू फोर्ट येथील खाडीत प्रस्तावित हावर्डक्र ाफ्ट पोर्ट लवकरच अस्तीत्वात आले पाहिजे. पश्चिम रेल्वेकडूनही उत्तर भारतातून येणाºया एक्स्प्रेस गाड्यांची डहाणू रोड रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपीएफकडून काटेकोर तपासणी केली जाते. त्यामध्ये पश्चिम एक्स्प्रेस व फिरोजपुर जनता या गाड्यांचा समावेश असून प्रत्येक बोगीत जाऊन प्रवाशांच्या सामान तपासले जाते. तर सीमा भागात गुजरात पोलिसांकडून कोस्टल मार्गावरील देहेरी चौकात वाहनांची तपासणी सुरू आहे. यावेळी मच्छीमार, रेल्वे प्रवासी सहकार्य करीत आहेत.
>एनसीसी एनएसएसच्या छात्रांना संधी द्यावी
मुंबई दहशतवादी हल्यानंतर किनाऱ्यांची सुरक्षा अभेद्य ठेवण्याकरिता सागरी पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली. मात्र काही कालावधीनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले असून आज कर्मचारी तैनात नाहीत. याकरिता गृह विभागाकडून मुबलक पोलीस कुमक दिली पाहिजे. शिवाय सागररक्षक आणि तत्सम दलाची उभारणी करताना स्थानिकांपैकी एनसीसी, एनएसएस, नेव्ही, स्कऊट व गाईड यांचा अभ्यासक्र म पूर्ण केलेल्यांचा समावेश होणे अधिक सोयीचे होईल.