रिक्षावाल्यांनी केली प्रवाशांची लूट

By admin | Published: March 9, 2017 02:10 AM2017-03-09T02:10:11+5:302017-03-09T02:10:11+5:30

मंगळवारी संध्याकाळी मालगाडी घसरल्याने बंद पडलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तब्बल १५ तासा नंतर पूर्ववत सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले

Robbery looted by the rickshaw drivers | रिक्षावाल्यांनी केली प्रवाशांची लूट

रिक्षावाल्यांनी केली प्रवाशांची लूट

Next

पालघर : मंगळवारी संध्याकाळी मालगाडी घसरल्याने बंद पडलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तब्बल १५ तासा नंतर पूर्ववत सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या घटनेत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना खाजगी वाहतूकदारांनी अनेक प्रवाशांची लूट केली.
काल संध्याकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी मुंबईकडे जाणारी मालगाडी घसरल्या नंतर अप व डाऊन ट्रॅक बंद पडले होते, मात्र स्थानिक प्रशासनाने तीन तासा नंतर डाऊन लाईन सुरु करु न मुंबईहुन गुजरात व दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानीसह एक्स्प्रेस गाड्याना प्राधान्य दिल्याने दैनंदिन प्रवासी संतप्त झाले होते. वलसाड पॅसेंजर सह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
सफाळे येथील रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी वापी येथून काल ८ वाजता पहिली क्रेन आली. आणि युद्धपातळीवर काम सुरु ठेऊन रेल्वे प्रशासनाने ९ वाजेपर्यंत काम सुरु केले व पहिली जम्मूतावी बांद्रा गाडी सफाळे स्थानकातून ९:१५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. ट्रेन्स अनिश्चित धावत असल्याने स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना माणुसकीच्या भावनेने मदत करण्याचे काम सर्वच स्थानकात चालू असतांना पालघर-बोईसर मधील रिक्षाधारकांनी मात्र दुप्पट-तिप्पट भाडेवाढ करून प्रवाशाना लुटण्याचे काम केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन्ही बाजू कडील रेल्वे सेवा ठप्प पडल्या नंतर डहाणू आणि विरारकडे जाणारा हजारो प्रवाशांचा लोंढा विविध स्थानकावर अडकून पडला होता. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तात्काळ विविध विभागांना आपल्या सेवा पुरविण्याच्या सूचना केल्या. एसटी महामंडळाच्या पालघर विभागाने डहाणू, विरार, सफाळे, बोईसर इ. भागातील प्रवाश्यांसाठी ५० बसेसची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला.पालघर विभाग नियंत्रक अजित गायकवाड, डेपो मॅनजर व्ही एस भंडारे यांनी योग्य नियंत्रण केले. तर दुसरीकडे पालघर ते बोईसर दरम्यानच्या सहाआसनी रिक्षाचे भाडे दर माणसी १५ रुपये असताना ५० रुपये घेऊन लूट केली. स्थानकांवर संघटनांनी प्रवाशाना पाणी, जेवण, नाश्ता इ. सेवा पुरविल्या.

Web Title: Robbery looted by the rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.