पेट्रोल पंपावर दरोडा, पाच जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:05 AM2020-01-10T01:05:44+5:302020-01-10T01:05:50+5:30
मंगळवारी मध्यरात्री पाच आरोपींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून पेट्रोल विक्रीचे पैसे आणि मोबाइल जबरदस्तीने खेचून आॅफीसची व सामानाची तोडफोड केली.
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका एचपी पंपावर मंगळवारी मध्यरात्री पाच आरोपींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून पेट्रोल विक्रीचे पैसे आणि मोबाइल जबरदस्तीने खेचून आॅफीसची व सामानाची तोडफोड केली. यावेळी पेट्रोल पंपावरील मशीनच्या आठ युनिटची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. वालीव पोलिसांनी पेट्रोल पंपावरील कॅशियरच्या तक्रारीवरून बुधवारी पाचही आरोपींविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा गावाच्या हद्दीमधील राधा फिलिंग इस्टेशन या एचपी पेट्रोल पंपावर मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका मोटार सायकलवरून तिघेजण आले. मात्र, दुचाकी बंद झाली म्हणून ती पंपाच्या आवारात उभी करण्यावरून झालेल्या बोलचालीचा राग मनात धरून पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पाचजण आले. पंपातील कॅशियर चंद्रकांत बलदेव पटेल (२८) आणि त्याच्यासोबत काम करणाºया सहकाºयाला या पाचजणांनी शिवीगाळ आणि दमदाटी करत ठोशाबुक्यांनी मारहाण केली. तसेच चंद्रकांत यांच्या खिशातील पेट्रोल - डिझेल विक्रीचे ४० हजार रुपये रोख आणि सहकारी अमित तिवारी यांच्या खिशातील १० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून घेतला. नंतर या पाचही आरोपींनी पेट्रोल पंपाच्या आॅफिसमध्ये घुसून स्वाईप मशीन, अॅटोमॅटिक मशीन, टीव्ही तसेच कॅबिनची काच फोडून पळून जात असताना पेट्रोल व डिझेल भरण्याच्या ८ डिस्पेनसिंग युनिट मशीनचीही तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.